अभिनेत्री भाग्यश्री मोटे झळकणार तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू'मध्ये  

अभिनेत्री भाग्यश्री मोटे झळकणार  तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू'मध्ये  

 


मराठीतील नवा ग्लॅमरस चेहरा म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री मोटे. मराठी, हिंदी सीरियल आणि मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकल्यावर आता ती सज्ज आहे, बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटात नावं कमावण्यासाठी.   भाग्यश्रीची नव्या वर्षाला दणक्यात सुरूवात  
 

 

 


View this post on Instagram


 

 

Little more from Sassy night!💃🏻💋 #lokmatmoststylishawards2018 @milokmat @thesocialhoot


A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on
मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हीने नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे  तिच्या ‘पाटील’ या चित्रपटाचे शो पश्चिम महाराष्ट्रात हाऊसफुल्ल होत आहेत. तसंच ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं समजतंय. इतकंच नव्हे तर, आता ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही झळकणार आहे.


भाग्यश्रीची झेप दक्षिणेत

भाग्यश्री मोटे लवकरच तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या सिनेमातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. हा एक कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र अजून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीखेची घोषणा करण्यात आलेली नाही. भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर शेअर करून लिहिलं की, माझ्या नवीन वर्षाची सुरूवात या बातमीने झाली. माझा तेलगूमध्ये पदार्पण असलेला चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू'चा टीझर प्रदर्शित झाला आहे.


काय आहे 'चिकती गदीलो चिताकोटुडू' चित्रपटाची कथा
 

 

 


View this post on Instagram


 

 

Chikati Gadilo Chithakotudu. Teaser out now. Link in bio.🔝


A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on
'चिकती गदीलो चिताकोटुडू' चित्रपटात मित्रमंडळी फिरण्यासाठी एका ठिकाणी जातात. ते ज्या ठिकाणी वास्तव्यास थांबतात. त्या ठिकाणी भूत असतं आणि मग त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.  


सोशल मीडियावर लोकप्रिय भाग्यश्री  
 

 

 


View this post on Instagram


 

 

🥧 #mood #Littlemessy


A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on
भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. तिच्या इन्स्टा अकाऊंटवर ती फॅन्सना सतत नवीन फोटोज टाकून अपडेट करत असते.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Making the most of it before i go. #beachbody #mostcalmplace


A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on
मराठी सीरियल ‘देवयानी’मध्येही ती मुख्य भूमिकेत दिसली होती. मराठी सीरियलबरोबरच तिने हिंदी सीरियल ‘देवो के देव महादेव’ आणि नंतर ‘सिया के राम’ मध्ये या सीरियलमध्ये शूर्पणखेची भूमिका केली होती.

भाग्यश्रीचं पहिलं नाटक होतं विश्वरत्न. त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर तिने विश्वगर्जना या नाटकातून पदार्पण केलं. तिने मालाडच्या प्रलादराय दालमिया लायन्स कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकोनॉमिक्समधून गॅज्युएशन केलं आहे.