अभिनेत्री दिया मिर्झाने एका वेगळ्याच अंदाजात आपण आई होणार असल्याचे शेअर केले आहे. दियाचा हा फोटो व्हायरल झाला असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दियाने काही महिन्यांपूर्वीच वैभव रेखीशी लग्नगाठ बांधली. दिया आणि वैभव या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. तर दिया पहिल्यांदाच आई होणार आहे. त्यामुळे दियाने ही भावना फोटो शेअर करताना मनापासून शब्दात मांडली आहे. मालदिव्जच्या समुद्रकिनाऱ्यावर आपल्या उदरात वाढत असलेल्या बाळावर हात ठेवत अगदी सुंदर फोटो दियाने शेअर केला आहे. दिया अत्यंत आनंदी दिसत असून तिच्या संपूर्ण भावना तिने कॅप्शन दिली आहे त्यामध्ये दिसून येत आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले करणार ‘मेरे साई’ मध्ये भूमिका
आयुष्याची नवी सुरूवात
दियाने समुद्रकिनाऱ्यावरील आपला एक फोटो शेअर करत आई होणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर हा फोटो तिचा नवरा वैभव रेखी यानेच कॅप्चर केला आहे. ‘हे माझे सौभाग्य आहे…धरती मातेप्रमाणेच एक माता होण्याचं, जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींची ही एक नवी सुरूवात आहे. गोष्टी, लोरी आणि गाणी आठवण्याची सुरूवात, आयुष्यातील सर्व चांगल्या आशा एकत्र येण्याची ही सुरूवात. माझे सौभाग्य आहे की माझ्या गर्भात वाढणाऱ्या या स्वप्नांना मी पूर्ण करू शकत आहे.’ तर दियाने हा फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्यावर अनेक सेलिब्रिटीजने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. विक्रांत मेस्सीने शुभेच्छा देत म्हटले, ‘खूप खूप शुभेच्छा दिया मॅम, तुम्हाला चांगले आरोग्य, शांतता आणि आनंद मिळो’ तर गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानीने आश्चर्यचकित होत दियाचे अभिनंदन केले, ‘काय? खूप शुभेच्छा दिया आणि वैभव. जगभरातील सर्व प्रेम तुम्हा दोघांना मिळो’ याशिवाय अनुष्का शर्माने हार्ट इमोजी देत तिचा आनंद व्यक्त केला. तर अंगद बेदी, महीप कपूर आणि दियाच्या अनेक चाहत्यांनीही तिचे अभिनंदन केले आहे.
‘फ्रँड्री’मधली शालू या कारणामुळे पुन्हा आली चर्चेत
मालदिव्जमध्ये वेळ घालवत आहे दिया
दिया नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सध्या दिया तिचा नवरा वैभव आणि त्याची मुलगी यांच्यासह मालदिव्जला सुट्टी एन्जॉय करत आहे. या सुट्टीचे अनेक फोटोही दियाने पोस्ट केलेले दिसून येत आहेत. मात्र दियाने आपण गरोदर असल्याचे सांगून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. दिया नेहमीच आपल्या पृथ्वीला वाचविण्यासाठी आपण कसं वागायला हवं हे सांगत असते. ती या सुट्टीतही निसर्गाशी न खेळता कसे जपा याबाबत सांगत आहे. दिया आणि वैभवने 15 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली होती. हे लग्नदेखील अत्यंत पर्यावरणाला पूरक अशा स्वरूपाचे झाले होते. तर दिया लग्नात अत्यंत सुंदर दिसत होती. आता आपण गरोदर असल्याचे सांगून दियाने आयुष्याची नवी सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. तर वैभवची पहिली मुलगी समायरासह दियाचे अत्यंत चांगले बाँडिंग असल्याचेही तिच्या या सुट्टीतील फोटोंवरून दिसून येत आहे. तर आता नक्की दियाचे बाळ कधी येणार याचीही तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
अर्जून कपूरने शेअर केला मंगळसूत्राचा फोटो, मलायकासाठी केलं का खरेदी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक