कोरोनाकाळातून आता बऱ्यापैकी सगळ्याच क्षेत्रांना सुटका मिळाली आहे. शुटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा शूट सुरु झाले आहे. लाईट- कॅमेरा- अॅक्शन असे आवाज कानी पडू लागले आहेत. पण एका शूट दरम्यान अभिनेत्रीसोबत जबरदस्ती करण्याचा किस्सा मुंबईत नुकताच घडला आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये असा किस्सा घडल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. दरम्यान या अभिनेत्रीसोबत अतिप्रसंग करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून या अभिनेत्रीचे नाव गुलदस्यात ठेवण्यात आले आहे. पण अशा घटनेमुळे पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ही अभिनेत्री मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शूट करत होती. दक्षिण मुंबईतील या हॉटेलच्या 37 व्या मजल्यावर हे शूटिंग सुरु होते. शूट आटोपल्यानंतर ज्यावेळी ही अभिनेत्री कपडे बदलण्यासाठी ज्यावेळी चेजिंग रुममध्ये गेली. त्यावेळी या हॉटेलमध्ये असलेल्या एका तरुणाने तिची छेड काढायला सुरुवात केली. त्यावेळी तिथे कोणीच नसल्यामुळे तिने आरडाओरड करत वाचवण्यासाठी लोकांना गोळा करण्याचा प्रयत्न देखील केला पण प्रसंगावधान राखत तिने तिथे असलेले आपात्कालीन बटण दाबले ज्यामुळे एकच भोंगा वाजला. काहीतरी बिनसले आहे हे समजून कर्मचारी ज्यावेळी तिथे पोहोचले त्यावेळी ही व्यक्ती अभिनेत्रीला त्रास देत होती. त्यांनी लगेचच त्या तरुणापासून अभिनेत्रीची सुटका केली.
पंचतारांकित हॉटेलमध्ये हा किस्सा रविवारी घडला आहे. पण या संदर्भात कोणतीही माहिती त्यावेळी बाहेर आली नाही. पण सूत्रांनी ही माहिती दिली असून आरोपी तरुणाची आता चौकशी सुरु आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर वेगवेगळी कलम लावण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईच्या एन. एम. जोशी पोलीस स्टेशनमध्ये ही संपूर्ण कार्यवाही होत असल्याची माहिती देखील समोर आली असली तरी अभिनेत्रीचे नाव आणि आरोपीची नाव यांची कुठेच वाच्यता करण्यात आलेली नाही.
तब्बूमुळे रखडलं आहे कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' चं शूटिंग
बलात्कार, अत्याचाराच्या घटना बऱ्यापैकी लॉकडाऊनमध्ये कमी झाल्या होत्या. कर्फ्युजन्य परिस्थिती असल्यामुळे अशा गोष्टी कमीच घडत होत्या. आता अनलॉक सुरु झाल्यापासून पुन्हा एकदा अशा अत्याचाराच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. वासनांध लोकांची ही वृत्ती पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. त्यामुळे महिलांनी काळजी घेणे फारच गरजेचे झाले आहे. अशा प्रकारचा त्रास कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासात येत असेल तर त्याची योग्य काळजी घ्यावी.
मुंबईसारख्या ठिकाणी सध्या अनेक टुरिस्ट वेगवेगळ्या राज्यातून यायला सुरुवात झाली आहे. लोकांचे येणे- जाणे वाढल्यामुळे अशा घटना आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Good News: कपिल शर्मा पुन्हा झाला बाबा, मुलाच्या जन्माची दिली बातमी