ADVERTISEMENT
home / मनोरंजन
'लोक काय म्हणतील'चं ओझं किती वहायचं, मराठी अभिनेत्रीचा प्रश्न

बाई, बुब्स आणि ब्रा वर झाली हेमांगी कवी व्यक्त, ‘लोक काय म्हणतील’चं ओझं किती वहायचं

अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi Dhumal) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. कोणाही ट्रोल केल्यानंतरही तितक्याच गांभीर्याने आणि बिनधास्तपणे ती उत्तर देते. समाजातील कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर बोलायला हेमांगी कधीही कचरत नाही. मग विषय कोणताही असो. ट्रेंडिंग व्हिडिओ असोत अथवा आपलं मत मांडायचं असो. कोणतीही गोष्ट तितक्याच बिनधास्तपणे हेमांगी नेहमी करताना दिसून आली आहे. आपल्या केवळ अभिनयानेच नाही तर अगदी आपल्या बुद्धिमत्तेने आणि विचारांनीही तिने नेहमीच आपल्या चाहत्यांना जिंकून घेतले आहे. आता पुन्हा एकदा हेमांगीने ब्रा अर्थात बाईच्या अंतर्वस्त्र आणि पुरूषांच्या आणि बायकांच्या याबाबतच्या विचाराबाबत आपले मत बिनधास्तपणे मांडले आहे. 

अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’साठी वाढवलं पाच किलो वजन, सेटवरचे फोटो व्हायरल

बाई, बुब्स आणि ब्रा (Bai, Boobs ani Bra)

हेमांगीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने बाई, तिची छाती अर्थात बुब्स आणि ब्रा याविषयी स्वतःचे मत व्यक्त केले आहे. प्रत्येक मुलीला याबाबत कधी ना कधीतरी हे सहन करावंच लागतं. पण यावर बिनधास्तपणे बोलणंही तितकंच गरजेचे आहे. हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की – 

बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो!

ADVERTISEMENT

मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही!

हाँ त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice!

पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं…

ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा social media वर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या image चा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना स्वतःच्याच शारीरिक स्वातंत्र्य साठी अजून किती struggle करायचाय हे लक्षात येतं!

ADVERTISEMENT

आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!

Tshirt मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा for that matter कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती natural पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी!

ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या comfortable आहेत त्यांनी ती जरूर घालावी, मिरवावी anything! Their choice! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं?

किती तरी मुली ब्रा घालून ही nipples दिसतात म्हणून काय काय उपद्व्याप करतात…tissue paper लावतात, nipple pads वापरतात, चिकट पट्टी लावतात… बाप रे!…कशासाठी एवढं आणि का?

ADVERTISEMENT

किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही ‘लोग क्या कहेंगे’ या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात. कामावरून, बाहेरून आल्यावर ज्या पद्धतीने मुली ब्रा काढून मोकळा श्वास घेतात ते जर त्याच ‘लोग क्या कहेंगे’ लोकांनां दाखवलं ना तर मुलींची दयाच येईल हो!

स्वतःच्या घरात असतानाही घरच्यांसमोर दिवसभर ती ब्रा घालून राहायचं आणि मग रात्री झोपेच्या वेळी ‘काढण्याची मुभा’ दिल्या सारखी काढून ठेवायची! त्यावेळी ही अंगावर ओढणी नाहीतर स्टोल असतोच! कश्यासाठी यार!

बाहेरच्या लोकांचं सोडून देऊ पण घरातले स्वतःचे वडील, भाऊ यांच्यासमोर पण ती ब्रा घालून राहायचं? का? त्याच बापाने मुलीला लहानपणी पूर्ण नग्न अवस्थेत पाहिलेलं असतं ना? मोठ्या किंवा लहान भावानं पाहिलेलं असतं मग मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे अवयव वाढल्यावर, त्यांचे अवयव असे मनाविरुद्ध बांधून, झाकून, लपवून ठेवायची काय गरज? ते वाढलेले अवयव जर घरातल्या पुरुषांच्या मनावर परिणाम करत असतील तर तो prob त्या पुरुषांचा आहे!

आमच्या घरात आम्ही घरात असताना ना कधी माझ्या मोठ्या बहिणीने ब्रा घातली ना मी घालत! माझ्या घरात माझे बाबा, मोठा भाऊ, गावाला गेले तर सर्व चुलते, चुलत भाऊ थोडक्यात घरातल्या सर्व पुरुषांसमोर आम्ही without ब्रा वावरतो! आम्हांला असं पाहून ना त्यांचे कधी विचार बदलले ना नजर! ना माझ्या आई मार्फत आम्हांला हे सांगण्यात आलं कारण आमच्याशी असलेलं नातं ‘त्यांच्या’ डोक्यात पक्कं आहे!

ADVERTISEMENT

आमची लग्न झाल्यावर ही काही बदललं नाही!

बाहेर जाताना, लोकांसमोर किंवा जेव्हा कधी वाटेल तेव्हाच ब्रा वापरली, वापरतो!

याचा माझ्या संस्कारांशी किंवा उगीचच पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करण्याचं फॅड वगैरे म्हणून अश्या कुठल्याच गोष्टींंशी काही संबंध नाही!

अरे किती ती बंधनं? किती ते ‘लोक काय म्हणतील’ चं ओझं व्हायचं?

ADVERTISEMENT

अबे जगू द्या रे मुलींना, मोकळा श्वास घेऊ द्या!

खरंतर हे सर्वात आधी स्त्रियांनीच आपल्या मनावर बिंबवून घ्यायला हवं! स्वइच्छे ने Without ब्रा वावरणे , दिसणारे nipples बघण्याची सवय करून घ्यायली हवी आणि तेवढीच ती द्यायला ही हवी! 

#कवीहुँमैं #हेमांगीकवी #kavihunmain #hemangikavi

ही अभिनेत्री होणार आई, दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

ADVERTISEMENT

बिनधास्तपणे मत मांडता यायला हवे

केवळ अभिनेत्री आहोत पण सोशल मीडियावर कोणीही उठून काहीही बोलणं योग्य नाही. अभिनेत्रींनादेखील स्वतःचे आयुष्य असते आणि ते कसे जगायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. हाच संदेश हेमांगीनेही आपले हे मत देऊन दिला आहे. हेमांगी कवीने किमान हे मांडायची हिंमत केली याच गोष्टीला सलाम….

राहुल वैद्यच्या संगीतची जोरदार तयारी सुरु, व्हिडिओ झाला व्हायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT