आपली मुलगी निसाच्या बॉलीवूडमधील डेब्यूबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नावर अभिनेत्री काजोलने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी निसा तिच्या फोटोजमुळे नेहमी चर्चेचा विषय ठरत असते.
View this post on Instagram
गेल्या काही दिवसापासून मीडियामध्ये खूशी कपूर, सुहाना खान आणि निसा देवगणच्या बॉलीवूड डेब्यूबाबत खूप जोरदार चर्चा आहे. त्यामुळे निसाच्या डेब्यूबाबत रोज काही ना काही नव्या बातम्या व्हायरल होतात. तर कधी तिचा पाठलाग पापाराझ्झी करत असल्याच्या बातम्या येतात.
नुकत्याच मुंबईत झालेल्या दादासाहेब फाळके एक्सलंस पुरस्कार 2019 सोहळ्यादरम्यान मीडिया आणि काजोलच्या झालेल्या संवादात हा प्रकार घडला.
यादरम्यान काजोलला मुलगी निसाच्या फिल्म करिअरबाबत विचारलं असता तिने संतप्तपणे अखेर खुलासा केला आणि सांगितलं की, ‘निसा ही फक्त 16 वर्षांची आहे, ती सध्या तिच्या बोर्ड एक्झाम्सची तयार करत आहे. तिला आत्ता मीडिया आणि इतर लोकांपासून दूर राहण्याची गरज आहे.’ यासोबतच काजोलने आपल्याला मिळालेल्या अवॉर्डबद्दल आनंद जाहीर केला आणि ज्यूरीना धन्यवाद दिले.
View this post on Instagram
बॉलीवूडची सेलिब्रिटी जोडी अजय आणि काजोल हे नेहमीच बोलत असतात की, आईबाबांच्या स्टारडममुळे त्यांच्या मुलांना बरंच काही सहन करावं लागतं. ‘टोटल धमाल’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अजय देवगणनेही मीडियाशी बोलताना हे म्हटलं होतं की, मी आणि माझी बायको स्टार असल्याने आम्हाला कळतं की, आमच्या रोजच्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवलं जातं. पण आमच्या मुलांसोबतही तसंच होणं योग्य नाही.
View this post on Instagram
नुकताच निसाच्या 16 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने काजोलने आपल्या मुलीसोबतचा क्युट फोटो शेअर केला होता आणि तिला विश केले होते.
अजय आणि काजोल जोडप्यावर का आली नवं घर शोधण्याची वेळ
काजोलच्या करिअरबाबत बोलायचं झाल्यास हेलिकॉप्टर ईला या चित्रपटात ती दिसली होती. पण हा चित्रपट प्रेक्षकांना काही खास आवडला नव्हता. त्यानंतर काजोलने एकही चित्रपट साईन न केल्याची चर्चा आहे. सध्या आपल्या कुटुंबाकडे आणि मुलांकडे लक्ष देत आहे. पण भलेही काजोल कोणत्याही चित्रपटात झळकणार नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी सदैव कनेक्टेड असते.