ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अभिनेत्री किश्वर मर्चंटने शेअर केला फोटो, आई होणार असल्याची केली घोषणा

अभिनेत्री किश्वर मर्चंटने शेअर केला फोटो, आई होणार असल्याची केली घोषणा

Bigg Boss फेम अभिनेत्री किश्वर मर्चंट (Kishwer Merchant) आणि अभिनेता – गायक सुयश राय (Suyyash Rai) लवकरच आई – बाबा होणार आहेत. किश्वरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. किश्वर आणि सुयश यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली असून आता ऑगस्ट 2021 मध्ये किश्वर आई होणार असल्याचे तिने सांगितले आहे. किश्वरने फोटो शेअर केल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून आता इतर आई झालेल्या सेलिब्रिटीच्या यादीमध्ये किश्वरच्या नावाचाही लवकरच समावेश होणार आहे.

मराठी फिल्मफेअर सोहळ्यात मारली ‘आनंदी गोपाळ’ने बाजी

आता विचारणं थांबवा म्हणाली किश्वर

किश्वरने आपण आई होणार हे सांगताना एक फोटो सोशल मीडियावर केला असून याला एक मजेशीर कॅप्शन दिलं आहे, ‘तुम्ही आई – बाबा कधी होणार हे विचारणं आता तुम्ही थांंबवा, लवकरच येत आहे…ऑगस्ट 2021, #sukishkababy’. यानंतर किश्वर आणि सुयशच्या मित्रमैत्रिणींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यामध्ये टीव्ही आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी आहेत. वयाच्या 38 व्या वर्षी किश्वरने आई होण्याचा निर्णय घेतला आहे. किश्वरचा नवरा सुयश राय हा उत्तम अभिनेता असून काही दिवसांपूर्वीच त्याचे गाणेही प्रसारित झाले होते. त्याच्या या गाण्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. किश्वर आणि सुयश घरी नवा पाहुणा येणार असल्याने खूपच आनंदी आहेत. आपला हा आनंद त्यांनी फोटो शेअर करून व्यक्त केला आहे. तर आता पाच महिन्याने किश्वर आई होणार आहे. किश्वर नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपले अप्रतिम आणि ग्लॅमरस फोटो ती पोस्ट करत असते. किश्वर आणि सुयशचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे या दोघांनाही कधी आई – बाबा होणार हा प्रश्न नेहमीच विचारण्यात येत होता. कदाचित त्यामुळेच किश्वरने कॅप्शनमध्ये त्याचं उत्तर दिलं असून आता हा प्रश्न विचारावा लागणार नाही असं म्हटलं आहे.

असं आहे दीपिका पादुकोणचे डेली रूटीन,शेअर केला व्हिडिओ

ADVERTISEMENT

अशी घडली किश्वर आणि सुयशची लव्ह स्टोरी (Kishwer Suyyash Love Story)

किश्वर मर्चंट आणि सुयश रायमध्ये आठ वर्षांचं अंतर आहे. सुयश हा किश्वरपेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. 2016 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली असून त्याआधी सहा वर्ष दोघे एकमेकांबरोबर नात्यात होते. #SuKishKiShadi हॅशटॅग वापरून या दोघांचे लग्न खूपच प्रसिद्ध झाले होते. दोघांचेही लग्न अतिशय मोठे झाले असून किश्वर लग्नात खूपच सुंदर दिसत होती. या दोघांचे लग्नाचे फोटो खूपच व्हायरल झाले होते. प्यार की यह एक कहानी या मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख पहिल्यांदा झाली. त्यानंतर मैत्री आणि प्रेमात रूपांतर झाले. दोघांनीही आतापर्यंत बऱ्याच मालिकांमधून काम केले असून दोघांचाही चाहता वर्ग मोठा आहे. इतकेच नाही तर दोघेही फिटनेसच्या बाबतीत अतिशय जागरूक असून नेहमीच सोशल मीडियावर फिटनेसबाबत व्हिडिओदेखील पोस्ट करत असतात. आता लवकरच मुलाची जबाबदारी घ्यायला दोघे तयार झाले असून येत्या ऑगस्टमध्ये घरी नवा पाहुणा येणार असल्याने दोघे आनंदात आहेत.

दुसऱ्या लग्नावरुन प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्यांना अभिज्ञाने दिले असे उत्तर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

02 Mar 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT