'तडजोड' करण्यासाठी तिप्पट पैशाची ऑफर, 'शुभमंगल ज्यादा सावधान'च्या अभिनेत्रीचा खुलासा

'तडजोड' करण्यासाठी तिप्पट पैशाची ऑफर, 'शुभमंगल ज्यादा सावधान'च्या अभिनेत्रीचा खुलासा

बॉलीवूड आणि मनोरंजन क्षेत्रातील कास्टिंग काऊच आता काही कोणाला नवे राहिलेले नाही.  प्रत्येकाला इथे कधी ना कधी कास्टिक काऊचचा अनुभव येऊन गेलेला आहे. कधी ना कधीतरी या गोष्टी बाहेर येतातच.  यावेळी ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ मधील गॉगल अर्थात मानवी गगरूने आपला अनुभव एका मुलाखतीमध्ये सांगितला. मानवीने अनेक वेबसिरीजमध्येही काम केलं आहे. त्यामुळे मानवी आता एक ओळखीचा चेहरा आहे.  मात्र तिने अगदी सुरुवातीच्या दिवसातील तिच्याबरोबर घडलेला एक किस्सा मुलाखतीमध्ये शेअर केला आहे. एका व्यक्तीने तिला वेबसिरीजचा प्रस्ताव देण्यासाठी फोन केला. तसंच त्या व्यक्तीने त्या बदल्यात आधी फारच कमी पैसे सांगितले.  त्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली तेव्हा त्या व्यक्तीने तिला कॉम्प्रॉमाईज अर्थात ‘तडजोड’ करण्यास सांगितले. 

क्वारंटाईन सेंटरसाठी या अभिनेत्याने दिले आपले पूर्ण हॉटेल, बीएमसीच्या मदतीसाठी पुढे

मानवीने केला खुलासा

मानवीने एका दिलेल्या मुलाखतीमध्ये या बाबीचा खुलासा केला आहे. मानवीने आपल्यासह सुरूवातीच्या दिवसात काय घडले ते सांगितलं, ‘एक वर्षापूर्वी एका व्यक्तीचा फोन आला. त्याला मी ओळखतही नव्हते. त्याने मला सांगितले की आम्ही एक वेबसिरीज बनवत आहोत. तुला त्यात आम्हाला कास्ट करायचे आहे. त्या वेबसिरीजचे बजेटही सांगितले. मी त्यावर त्याला म्हटले की हे तर खूपच कमी बजेट आहे. तू मला बजेटबद्दल का सांगतोय. मला तू स्क्रिप्ट पहिले दाखव, जर मला स्क्रिप्ट आवडली तर आपण पुढे बोलू. तर त्याने विचारलं की या बजेटवर तू काम करशील का? मी नकार दिला. नकार दिल्यावर त्याने तिप्पट पैसे वाढवले आणि त्यावर तो म्हणाला, मी तुला इतके पैसे देऊ शकतो, पण तुला तडजोड करावी लागेल.’ मानवीने त्यानंतर तिला त्याच्या बोलण्याचा अत्यंत राग आल्याचे सांगितले. त्यानंतर तिने हेदेखील स्पष्ट केले की, मी साधारण 7-8 वर्षानंतर तडजोड करावी लागेल अशा स्वरूपाचे शब्द ऐकले. मी त्याच्यावर ओरडून फोन ठेवायला सांगितला आणि त्याला पोलिसांमध्ये जाण्याची धमकीही दिली. अशा स्वरूपाच्या गोष्टी नक्कीच मनाला त्रासदायक ठरत असल्याचेही मानवीने सांगितले. याआधी असे अनेक प्रसंग वेगवेगळ्या अभिनेत्रींनी सांगितले आहे. त्यानंतर तनुश्री दत्ताने उचललेल्या पावलामुळे एक #metoo चळवळच सुरू झाली होती. पण असे किस्से अनेकांच्या बाबतीत घडत असतात. फक्त त्यांनी त्यावर आवाज उचलण्याची आणि हिमतीने त्याला सामोरं जाण्याची गरज असते. मानवीनेही सामोरं जात हिंमत दाखवली आणि आपल्याबाबत नक्की काय घडलं हेदेखील सांगितलं आहे. 

लॉकडाऊनमध्ये रिया कपूरला येत आहे सोनमची आठवण, शेअर केला बालपणीचा फोटो

फोर मोअर शॉर्ट्स प्लीजमध्ये दिसणार मानवी

मानवीने आतापर्यंत अनेक वेबसिरीजमध्ये काम केले आहे. त्याशिवाय शुभमंगल ज्यादा सावधानमधील तिच्या भूमिकेनेही तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली. टीव्हीएफच्या ट्रिपलिंग या वेबसिरीजमधील तिच्या कामाची खूपच प्रशंसाही झाली. आता लवकरच येणाऱ्या फोर मोअर शॉर्ट्स प्लीजमध्ये देखील मानवी दिसणार आहे. 17 एप्रिलला ही वेबसिरीज प्रदर्शित होते आहे.  याचा पहिला भाग प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यामुळे आता दुसऱ्या भागात मानवी काय कमाल दाखवणार याकडेही तिच्या चाहत्यांचं लक्ष आहे. 

अभिनेता म्हणून चालला नाही पण गायक म्हणून झाला हिट

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा