अभिनेत्री मानसी नाईकच्या ग्रहमखाचे खास फोटो, लग्नाच्या विधींना सुरूवात

अभिनेत्री मानसी नाईकच्या ग्रहमखाचे खास फोटो, लग्नाच्या विधींना सुरूवात

सध्या बॉलीवूड असो वा मराठी चित्रपटसृष्टी असो सगळीकडेच लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतेच अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि अभिज्ञा भावे यांच्या लग्नाच्या विधीपासून ते लग्नापर्यंत फोटो व्हायरल झाले होते. आता अभिनेत्री मानसी नाईकही लग्नबंधनात अडकत आहे. काही महिन्यांपूर्वीच मानसीचा साखरपुडा झाला होता. तर आता 19 जानेवारीला मानसी प्रदीप खरेरा याच्यासह लग्नाच्या बेडीत अडकत आहे. मानसीच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली असून मानसीने आपल्या सोशल अकाऊंटवर ग्रहमखाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. (#ManuKiShadi) मानसीच्या चाहत्यांनी आणि मित्रमैत्रिणींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या दोन्ही जवळच्या मैत्रिणी दिपाली सय्यद आणि सीमा कदम यांनी मानसीसाठी स्पिन्सर्स पार्टीदेखील केली होती. मानसी अत्यंत आनंदी दिसत असून मानसीच्या लग्नाचा लुक कसा असेल याचीही आता चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

अमृता खानविलकरने केले चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ, फोटो व्हायरल

मानसीचे ग्रहमखाचे काही खास फोटो

ग्रहमख हा लग्नाचा एक अत्यंत महत्त्वाचा विधी असतो. मानसीच्या लग्नाआधीचा हा विधी अत्यंत उत्साहात पार पडला असून याचे फोटो मानसीने पोस्ट केले आहेत. तसंच अत्यंत भावूक अशी कॅप्शनही मानसीने या फोटोखाली दिली आहे.

‘लग्न म्हणजे रेशीम गाठ । अक्षता आणि मंगलाष्ट्का सात| 

दोनाचे होणार आता चार हात । दोन जीव गुंतणार एकमेकांत

गोड गोजिरी लाड लाजिरी । लाडकी आई बाबाची

नवरी होणार आज तू । सून एका नव्या घराची

स्वप्न दोघांच्या लग्नाचे । मंगलाष्टकांनी पूर्ण होते

शुभ आशीर्वादाच्या साथीने । नव्या संसाराची सुरवात होते’

कोणत्याही मुलीसाठी लग्न म्हणजे एक वेगळीच भावना असते आणि आपल्या आईवडिलांना सोडून जाण्याचे दुःख, नव्या संसाराची  जबाबदारी आणि सासरची स्वप्नं या सगळ्याच भावना एकत्र असतात. याच भावना मानसीने मांंडल्या आहेत. कोणत्याही लग्न करणाऱ्या  मुलीला हे वाचून नक्कीच भरून येईल. मानसीचीही सध्या अवस्था काही वेगळी नसेल हे सांगणे न लागे.  मानसीने आपल्या आई वडिलांसह व्हिडिओदेखील शेअर केला आहे. तसंच मानसीचं संपूर्ण कुटुंब या फोटोंमधून दिसून येत आहे. 

ह्रतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा फायटर असणार या वर्षीचा बिग बजेट चित्रपट

बाबांची लाडकी परी जाणार नशिबवान व्यक्तीच्या घरी

प्रत्येक मुलगी ही आपल्या आई वडिलांसाठी विशेषतः आपल्या वडिलांची परी असते आणि हीच भावना मानसीने आपल्या अजून एका फोटोमधून व्यक्त केली आहे. ‘मन्नतो से मांगी हुई जन्नत की दुनिया से आई हुं ..! में अपनी पापा की सहजादी हुं ना, इसलिए बहुत किस्मत वालोंं को अपना हमसफ़र बनाऊँँगी’ असं म्हणत मानसीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयीदेखील सांगितलं आहे. प्रदीप खरेरा हा बॉक्सर असून मानसी आणि प्रदीप यांचा हा प्रेमविवाह आहे. मानसी नेहमीच आपल्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. प्रदीप खरेरासह मानसीने आपले अनेक फोटो पोस्ट केले आहेत. साखरपुडा झाल्यानंतर मानसीने अनेक फोटो पोस्ट केले असल्याचे दिसून आले आहे. मानसी सध्या कोणत्याही चित्रपटात अथवा मालिकेत काम करत नसली तरीही ती सोशल मीडियावर मात्र अॅक्टिव्ह असते. मानसीच्या पुढच्या प्रवासासाठी ‘POPxo मराठी’ कडून शुभेच्छा!

Bigg Boss 14 : राहुल वैद्यला सतत केलं जातंय टार्गेट, मेकर्सवर फॅन्स नाराज

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक