धक्कादायक! मराठी अभिनेता आशुतोष भाकरेची आत्महत्या

धक्कादायक! मराठी अभिनेता आशुतोष भाकरेची आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येतून बाहेर येत नाही तोच आता आणखी एका अभिनेत्याच्या आत्महत्येने मराठी प्रेक्षकांना धक्का दिला आहे. अभिनेता आशुतोष भाकरे याने बुधवारी त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. खुलता कळी खुलेना फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा आशुतोष हा पती. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबियांना धक्का बसला आहे. आशुतोषने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण आशुतोष हा मानसिक ताणाखाली होता अशी चर्चा होत आहे. पण याबद्दल अद्यापही कोणता खुलासा झालेला नाही. 

सुशांतच्या केसमध्ये नवे वळण, रियावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

आत्महत्येचे कारण मानसिक तणाव ?

Instagram

आशुतोष आणि मयुरी त्यांच्या नांदेड येथील बंगल्यात एक महिन्यापूर्वीच आले होते.संपूर्ण कुटुंबासोबत ते राहात होते.  बुधवारी अचानक त्याने आपल्या खोलीत जाऊन गळफास लावून घेतला. तो बराच वेळ खाली आला नाही म्हणून त्याला पाहण्यासाठी गेल्यावर त्याने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी आशुतोषने त्याच्या फेसबुकवर शेअर केलेला आत्महत्येसंदर्भातील एक व्हिडिओ पाहता तो मानसिक तणावाखाली होता का? याकडे इशारा देत आहे. या व्हिडिओमध्ये एखादा माणूस आत्महत्येचे पाऊल का उचलतो? या संदर्भात सांगत आहे.  हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याने अचानक आत्महत्या केल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्याच्या फॅन्सनीही या बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

मराठी चित्रपटातील चेहरा

आशुतोष भाकरे याने ‘भाकर’, ‘इचार ठरला पक्का’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला या चित्रपटांमधून चांगलीच ओळख मिळाली होती. त्यामुळे त्याने अशापद्धतीने पाऊल उचलणे अनेकांना खटकले आहे. 

नेहा कक्कर यंदा सारेगमच्या सेटवर साजरा करणार 'रक्षाबंधन'

नात्यातील दुरावा एक अफवा

Instagram

आशुतोष आणि मयुरी 2016 साली विवाहबंधनात अडकले. त्यांचे अने फोटो सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केले आहेत. त्यांच्या नात्यात वितुष्ट आले आहे, अशा अफवांना आशुतोषच्या आत्महत्येनंतर उधाण आले होते. पण तसे काहीच नाही आशुतोष आणि मयुरी एकत्र होते. लॉकडाऊनमध्ये त्यांनी त्यांचा सगळा वेळ कुटुंबासोबत अगदी आनंदात घालवला होता. त्यांच्या नात्यात कोणताही दुरावा नव्हता हे अगदी स्पष्ट आहे. असे असले तरी आशुतोषच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उभे केले आहेत. पोलीस या संदर्भात अधिक तपास करत असून या मागची सत्यता तपासांतीच कळू शकेल. 

मयुरीला मिळाली होती बिग बॉसची ऑफर

Instagram

दरम्यान मयुरी देशमुख ही मराठीतील जाणता चेहरा असून ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने नाटकांमध्येही काम मिळवली. तिला बिग बॉस मराठीचीही ऑफर मिळाली होती. पण तिने ती ऑफर नाकारल्याचेही स्पष्ट केले आहे. तिने या संदर्भात सांगितले की, मला माझे खासगी आयुष्य जपायला आवडते. हा शो माझ्यासाठी नाही. म्हणत तिने या शोला नकार दिला होता. 


आता आशुतोषच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईपर्यंत वेगवेगळ्या चर्चांना उधाण येणार आहे हे नक्की!

शोले चित्रपटाच्या सेटवर गब्बर सिंह म्हणजेच अमजद खान प्यायचे इतका चहा