अभिनेत्री मिताली मयेकरच्या बिकिनी फोटोने सोशल मीडियावर वाढला हॉटनेस

अभिनेत्री मिताली मयेकरच्या बिकिनी फोटोने सोशल मीडियावर वाढला हॉटनेस

अभिनेत्री मिताली मयेकर हा चेहरा मनोरंजन जगामध्ये नक्कीच नवा नाही. मितालीने आपल्या सोशल सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. मितालीने बिकिनीमध्ये असणारा आपला एक फोटो शेअर केला असून सोशल मीडियावर चांगलाच हॉटनेस वाढवला आहे असं म्हणावं लागेल. अगदी मराठी इंडस्ट्रीतील बऱ्याच जणांनी मितालीच्या या फोटोंवर कमेंट्स दिल्या आहेत. तर मितालीच्या  चाहत्यांनीही भरभरून कमेंट्स केल्या आहेत. मितालीच्या या फोटोने नक्कीच तिच्या चाहत्यांना घायाळ केले केले. तिच्या या बोल्ड फोटोलो अनेक लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर अमृता खानविलकर, अभिज्ञा भावे, रुतुजा बागवे या सर्वांनीच तिला कमेंट्स दिल्या आहेत. 

'पानिपत'मधील या मराठमोळ्या अभिनेत्रीने कोरोना काळात केले लग्न, फोटो व्हायरल

मितालीला येत आहे समुद्रकिनाऱ्याची आठवण

मिताली नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि आपले वेगवेगळे फोटो आणि  आपल्या प्रोजेक्टबद्दलही ती पोस्ट करत असते. सध्या सगळेच लॉकडाऊनमुळे घरात आहेत आणि केलेल्या प्रवासांची आणि मजेची सध्या सगळ्यांनाच आठवण येत आहे. अशीच एक आठवण म्हणून मितालीने आपला हा बिकिनीतील फोटो शेअर केला आहे. समुद्रकिनाऱ्याची आठवण येत असल्याचे आणि पुन्हा हे दिवस कधी पाहायला मिळतील याची वाट बघत असल्याचे मितालीने या फोटोखाली दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. मिताली आपले बोल्ड फोटो नेहमीच पोस्ट करत असते. याआधी तिला बोल्ड फोटोसाठी टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. मात्र आपल्या प्रोफाईलमध्ये  बोल्ड फोटो करण्यात काहीही वावगं नाही आणि आपण जसे आहोत तसंच राहणार असून बालकलाकार म्हणून असलेली प्रतिमा आपल्याला बदलायची आहे असंही मितालीने याआधी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे कोणीही काहीही बोललं तरीही आपण जसे आहोत तसंच आपल्या प्रोफाईलवर दिसणार असं मितालीने याआधीही सांगितलं आहे. मितालीने अनेक फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. 

शिल्पा शेट्टीचा खुलासा, सुखी जीवन जगण्यासाठी ‘या’ व्यक्तीला करते फॉलो

मिताली आणि सिद्धार्थ अडकणार लग्नबंधनात

मिताली आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी गेल्यावर्षी साखरपुडा करून सगळ्यांनाच सुखद धक्का दिला होता. त्यामुळे आता हे दोघं लग्न कधी करणार याकडेही त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र दोघेही सध्या आपापल्या कामात व्यस्त आहेत. लग्नाबाबत दोघांनीही आतापर्यंत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र या मराठमोळ्या जोडीचे असंख्य चाहते आहेत. यांचा दोघांचाही फोटो सोशल मीडियावर आला की कमेंट्सचा पाऊस पडतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसंच मितालीने आतापर्यंत मराठी मालिका, हिंदी चित्रपट यामध्ये काम केलं आहे. मात्र आता ती कुठल्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याबद्दलही तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तिला सोशल मीडियावर तर अनेक फॉलोअर्स आहेत. पण तिला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहण्याचीही तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे मितालीने लवकरच आता लहान अथवा मोठ्या पडद्यावर दिसावं असंही तिच्या चाहत्यांना वाटत आहे. तसंच सिद्धार्थ आणि मितालीने एकत्र कोणत्या तरी प्रोजेक्टमध्ये काम करावं असंही बऱ्याच जणांना वाटत आहे. पण सध्या लॉकडाऊनमध्ये हे जरी शक्य नसलं  तरीही मितालीचे फोटो पाहूनच चाहत्यांना समाधान मानावं लागत आहे. पण  लवकरच मितालीला कोणत्या तरी मालिकेत अथवा चित्रपटात पाहता येईल अशीही तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. 

कपिल शर्माची सोशल मीडियावर होतेय वाह वाह