नव्या चित्रपटासाठी मोनालिसा बागलचा Fit & Fine लुक

नव्या चित्रपटासाठी मोनालिसा बागलचा Fit & Fine  लुक

गेल्या वर्षीचा लॉकडाऊन (Lockdown) आपण सर्वांनी अनुभवला आणि यंदाचा लॉकडाऊन देखील अनुभवतोय. लॉकडाऊनमध्ये आपण काय करू शकतो तर आपण घराबाहेर न पडता स्वतःची काळजी आणि इतरांची काळजी घेऊ शकतो. घरी बसल्या आपल्याला आवडेल त्या गोष्टी करून आपलं मन गुंतवून ठेवू शकतो. अनेक ठिकाणी कामांना पुन्हा ब्रेक लागला आहे. वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे पुन्हा अनेकांना घरून काम  करावे लागतेय त्यामुळे 'जग थांबलंय' ही भावना पुन्हा एकदा बऱ्याच जणांच्या मनात सतत येतेय हे सोशल मीडियावरून लक्षात येते. यासाठी एकच उपाय म्हणजे 'संयम'. सर्व काही सुरळीतपणे पुन्हा सुरू होईल असा विश्वास बाळगा, असं अभिनेत्री मोनालिसा बागल (Monalisa Bagal) आपल्या चाहत्यांना सांगत आहे. या लॉकडाऊनमध्ये मोनालिसाने आपल्या फिटनेसकडे लक्ष देत नव्या चित्रपटासाठी अगदी फिट आणि फाईन (Fit and Fine Look) असा लुक केला आहे. 

आणखी एका अभिनेत्रीचा सोशल मीडियाला रामराम, दिले हे कारण

स्वतःला वेळ देत केले वजन कमी

Monalisa Bagal

चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले होते, नवीन वर्षाची नवी उमेद मिळाली होती आणि असं असताना सिनेसृष्टीलादेखील ब्रेक लागला. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा मोनालिसा बागलने पुरेपूर वापर केला, स्वतःला वेळ दिला आरोग्याची काळजी घेतली. नवीन वर्षात सर्वकाही सुरळीत चालू होते, त्यावेळी तिने वजन कमी करण्याकडे विशेष लक्ष दिले. एका नव्या चित्रपटासाठी ती वजन कमी करत होती आणि पुन्हा लॉकडाऊन आला... पण आता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत, फिटनेसकडे पूर्णपणे लक्ष देत, योग्य डाएट करून मोनालिसा कमी केलेले वजन तसेच मेन्टेन करण्याकडे विशेष लक्ष देतेय. मोनालिसाचा हा लुक तिच्या चाहत्यांनाही भलताच आवडत आहे. मोनालिसाने फारच कमी वेळात आपला असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अत्यंत निरागस असा चेहरा आणि आपल्या अभिनयाने मोनालिसाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. मोनालिसाचे फोटोही अत्यंत सुंदर येतात. ती नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.  मोनालिसा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मध्यंतरी तिच्या फोटोंवरून, इंस्टाग्राम रिल्सवरून तिचा Fit & Fine  लुक तिच्या चाहत्यांच्या लक्षात आला होता.  वजन कमी केल्या नंतरचे नवीन स्टायलिश आणि ट्रेडिशनल फोटो मोनालिसाने शेअर केले होते. अर्थात, तिचे नवीन फोटोज आणि तिच्या या नवीन लुकसाठी तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. 

सोनू सूद पुन्हा एकदा गरिबांच्या मदतीला, ट्विट व्हायरल

गस्त चित्रपटातून दिसली

'गस्त' सिनेमात अमर आणि सुजाताच्या भूमिकेतून अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अभिनेता तानाजी गालगुंडे दिसणार एकत्र दिसले. या चित्रपटातून दोघेही प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची कमाल दाखवली. मोनालिसाचा नवा सिनेमा, या सिनेमाची नवीन जोडी, नवी गोष्ट यामुळे सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देखील कळवल्या होत्या. मोनालिसाचा चाहता वर्गदेखील दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर लवकरच ‘भिरकिट’ सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांचे पुन्हा मनोरंजन करण्यासाठी अभिनेत्री मोनालिसा बागल झाली सज्ज झाली आहे. लॉकडाऊननंतर या चित्रपटातून मोनालिसा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या मोनालिसा कितीही व्यस्त असली तरीही फिटनेसकडे मात्र नक्कीच आवर्जून लक्ष देत आहे. 

सना खाननंतर आता आशका गोराडियाने घेतला अभिनयातून संन्यास

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक