या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईला 'बाय बाय', कारण गुलदस्त्यात

या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईला 'बाय बाय'

अनेक कलाकार मुंबईत आपलं घर असावं आणि मुंबईत काम मिळावं या हेतून या मायानगरीमध्ये प्रवेश करतात. प्रत्येकाला इथे आपलं स्वप्नं पूर्ण करायचं असतं. पण अशी एक मराठमोळी अभिनेत्री आहे तिने मात्र मुंबईला Good Bye करायचे ठरवले आहे. आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकाना भुरळ पाडणारी अशी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने bye bye Mumbai असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मृण्मयी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. अनेक वेळा आपले आणि आपल्या नवऱ्याचे फोटो ती शेअर करत असते. पण आता मृण्मयी मुंबईला बाय करून नक्की कुठे चालली आहे याची चर्चा रंगली आहे. 

जेव्हा संगीताचा देव ए. आर. रहमान करतो मराठमोळ्या अंजलीची स्तुती…

प्रेक्षकांवर सोडली आहे अभिनयाची छाप

मृण्मयीने लहान पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. कुंकू या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या मृण्मयीने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांंमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. आता मृण्मयीची बहीणही मालिकेतून काम करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेत आहे. मृण्मयीने ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मोकळा श्वास’, ‘फत्तेशिकस्त’, ‘नटसम्राट’, ‘शिकारी’ अशा अनेक मराठी चित्रपटांमधूनही काम केले आहे. मग अचानक मुंबईला का बाय बाय करत आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. मृण्मयीने काही वर्षांपूर्वीच लग्न केले आहे. त्यामुळे आता ती संसारात रममाण होण्याचा विचार करत आहे का? असाही प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. स्वप्नील रावशी लग्न केल्यानंतरदेखील मृण्मयी काम करत होती. मात्र मृण्मयीने अचानक फोटो शेअर करत Time to Leave...Bye Bye Mumbai असं म्हणून चाहत्यांना धक्का दिला आहे. तिने पॅकिंग करत असतानाचा फोटो शेअर केला आहे.  पण आता ती नक्की कुठे शिफ्ट होतेय याचीदेखील उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. चाहतेही तिच्या या फोटोमुळे गोंधळले आहेत. 

दिया मिर्झानंतर आता प्रीती झिंटाकडेही आहे का गोड बातमी

लग्नाचा वाढदिवस केला गोव्यात साजरा

मृण्मयीने लग्नाचा चौथा वाढदिवस गोव्यात साजरा केला होता. स्वप्नील आणि मृण्मयीचा लग्नसोहळा खूपच थाटात झाला होता. अगदी पेशवाई पद्धतीने झालेल्या या सोहळ्या मृण्मयी खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या लग्नसोहळ्या इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. मृण्मयीचा प्रवास हा नक्कीच थक्क करणारा आहे. केवळ अभिनयापुरतं मर्यादित न राहता ‘मन फकिरा’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शनही तिने केलं आहे. तिचा हा चित्रपट खूपच अप्रतिम होता. एक वेगळा विषय हाताळताना मृण्मयीने काहीतरी वेगळं करायचं आहे हे नक्कीच दाखवून दिलं होतं. पण अशीही मृण्मयी नक्की मुंबई सोडून कुठे आणि का चालली आहे हे मात्र गुपितच आहे. आता ती खरंच शिफ्ट होतेय की एखाद्या चित्रपटासाठी तिने हा फोटो पोस्ट केला आहे याचीच चर्चा रंगली आहे. मात्र अजूनही ही गोष्ट गुलदस्त्यातच आहे. मृण्मयीला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच तिचे चाहते शुभेच्छा देत आहेत. 

सप्तरंगी स्विमसूटमधल्या जान्हवीच्या अदा, मालदिव्ज वेकेशनचे फोटो व्हायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक