अभिनेत्री नीना गुप्ताचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री नीना गुप्ताचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री नीना गुप्ता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकोणसाठ वर्षाच्या नीना गुप्ताने आतापर्यंत आपल्या सक्षम अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट हिट केले आहेत. मात्र सध्या नीना गुप्ता सोशल व्हायरल होण्याचं कारण थोडं वेगळं आहे. नीना गुप्ताचा हा बोल्ड अंदाज सध्या तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. नीना गुप्ता एक राष्ट्रीय पूरस्कार प्राप्त अभिनेत्री आहे. नीनाने अनेक हिंदी चित्रपटातून काम केलं आहे. तिचा अभिनय आणि एकोणसाठ वयात असलेला उत्साह वाखाणाजोगा आहे. नीनाने एखादी साडी नेसू दे अथवा एखादा वन पीस ती कोणत्याही लुकमध्ये सुंदरच दिसते. 

नीनाची 'बधाई हो'मध्ये होती हटके भूमिका

नीना गुप्ताने 'बधाई हो' या चित्रपटात आयुषमान खुरानाच्या आईची भूमिका केली होती. या चित्रपटात नीनाने एक अशी आई साकारली होती जी वयाच्या पन्नाशीत आई होते. या चित्रपटाचा विषय नेहमीपेक्षा हटके असल्यामुळे या चित्रपटाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात नीना गुप्ताने तिच्या अनोख्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. ही भूमिका पडद्यावर साकारणं तिच्या नक्कीच आव्हानात्मक होतं. कारण तिला एक अशी नवमाता साकारायची होती जिला आधी दोन तरूण मुलं आहेत. शिवाय वयाच्या या टप्पावर आई होण्याचा निर्णय घेताना समाज आणि कुटुंब यांच्याकडून होणारी अवहेलना तिने या चित्रपटातून कौशल्याने साकारली होती. असं असलं तरी खऱ्या जीवनात मात्र नीना अगदी दिलखुलास आणि बोल्ड आहे. हे तिच्या आताच्या या बोल्ड फोटोशूटवरून दिसून येतं.

नीनाला लाईक आणि कंमेट्स आवडतात

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत नीनाने तिच्या बोल्ड लुकचं रहस्य उघड केलं होतं. नीनाच्या मते तिला सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायला आवडतं. सोशल मीडियावर होणाऱ्या नवनवीन घडामोडी, फोटो पाहण्याची तिला आवड आहे. मात्र जेव्हा तिला विचारण्यात आलं की तिचा हा बोल्ड लुक एखाद्या चित्रपटात तरूण भूमिका मिळावी यासाठी आहे का ? त्यावर हसून नीनाने तिच्या बेधडक वृत्तीने दिलखुलास उत्तरदेखील दिलं. नीना बोल्ड भूमिका मिळावी म्हणून नाही तर तिला फॅशनेबल कपडे आवडतात म्हणून असा लुक ठेवते. शिवाय तिचं असंही म्हणणं आहे की, “ परमेश्वराने मला सुंदर आणि सुडौल शरीर दिलं आहे त्यासाठी मी देवाची आभारी आहे. मला बोल्ड लुकचे कपडे सुट करतात त्यामुळे मी असे लुक ट्राय केले तर काहीच बिघडत नाही. शिवाय माझ्या या हॉट लुकवर मला भरपूर लाईक्स आणि कंमेट्स मिळतात. मला अगदी क्वचितच निगेटिव्ह कंमेट मिळतात. मला माझी प्रंशसा नेहमीच आवडते म्हणूनच मी माझा लुक स्पेशल असेल याची काळजी घेते." 

नीना गुप्ता आहे सिंगल मदर

नीना गुप्ता एक सिंगल मदर आहे. तिची मुलगी मसाबा एक लोकप्रिय फॅशन डिझाईनर आहे. नीनाला तिच्या मुलीने याच क्षेत्रात पुढे नाव कमवावं असं वाटतं. अभिनयपेक्षा मसाबा फॅशन इंडस्ट्रीमध्येच यशस्वी होऊ शकते यावर तिचा विश्वास आहे. नीना गुप्ता बधाई हो च्या यशानंतर लवकरच सुर्यवंशीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुर्यवंशीमध्ये नीना गुप्ता अभिनेता अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारणार आहे. याशिवाय नीना लवकरच कंगना रणौतच्या पंगामध्येदेखील दिसणार आहे. त्यामुळे नीनाच्या चाहत्यांना तिच्या अभिनयाची झलक पुढील वर्षी पुन्हा नक्कीच पाहण्यास मिळेल.