बोल्ड अवतारात इन्स्टावर झळकणारी ड्रीमगर्ल नुसरत भरूचा

बोल्ड अवतारात इन्स्टावर झळकणारी ड्रीमगर्ल नुसरत भरूचा

सोनू के टीटू की स्वीटी, प्यार का पंचनामा 2 आणि ड्रीमगर्लसारख्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये स्वतःचं वेगळं असं स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे नुसरत भरूचा. फार थोड्या काळात नुसरतने भरपूर फॅन फॉलोइंग मिळवलं आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या लुक्स आणि फॅशन सेन्समुळेही ती सतत चर्चेत असते. चला मग जाणून घेऊया तिच्या फॅशन क्वोशंटबाबत.

नुसरतच्या फॅशन क्वोशंटबाबत बोलायचं झाल्यास तिचे आधीचे लुक्स आणि आताचे लुक्स पाहिल्यास तिच्यामध्ये खूप आणि चांगला बदल झाल्याचं दिसून येईल. नुसरतच्या इन्स्टा अकाऊंटवरील तिचे हॉट फोटोज आणि रेड कार्पेट फोटो पाहिल्यावर तुम्हाला याची कल्पना येईल.

नुसरतचे बीच वेकेशनवरील स्मोकिंग हॉट बिकीनी फोटोज पाहून तुम्हालाही बीच वेकेशनवर जायची इच्छा होईल. पण लॉकडाऊनमुळे तुम्हाला थोडं थांबावं लागेल.

View this post on Instagram

Tropic like it’s hot 🔥 . . 📸 @sanjnas 😘

A post shared by nushrat (@nushratbharucha) on

आहेत ना नुसरचे बिकीनी फोटोज हॉट.

स्मोकिंग हॉट बिकीनी फोटोज असोत किंवा तिचा भरपूर व्हायरल झालेला ग्रीन हाय स्लीट गाऊन असो.

नुसरतने आपल्या लुक्समुळे अनेकदा हेडलाईन्स आणि मीम्सवर राज्य केलं आहे.

दिवसेंदिवस नुसरतच्या फॅशन सेन्समध्ये व्हरायटी पाहायला मिळत आहे

एवढंच नाहीतर फिटनेसबाबतही नुसरत फारच कॉन्शियस आहे. लॉकडाऊनच्या काळात नुसरतने तिच्या फिटनेस वर्कआऊट आणि ब्युटीची सिक्रेट रेसिपीही शेअर केली.

View this post on Instagram

#EveningRituals #SunsetMood #LockdownDay8

A post shared by nushrat (@nushratbharucha) on

इन्स्टावर जरी नुसरत नेहमी बोल्ड अवतारात दिसत असली तरी तिच्या भूमिकांमध्ये मात्र ती अगदी साध्या लुकमध्येही छान दिसते. तिच्या आगामी ‘छलांग’ या राजकुमार राव सोबतच्या चित्रपटात ती अगदी सिंपल लुकमध्ये दिसत आहे. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. मार्चमध्ये रिलीज होणारा हा सिनेमा आता जूनमध्ये ढकलण्यात आलाय. 

तुम्हालाही आवडते का नुसरत भरूचा आणि तिचा फॅशन सेन्स. तुम्हाला कोणाबाबत वाचायला आवडेल #POPxoMarathi वर. आम्हाला नक्की सांगा.