मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलचं ‘स्पेशल’ फोटोशूट

मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलचं ‘स्पेशल’ फोटोशूट

तुम्ही अनेक बॉलीवूड सेलेब्सचं हॉट फोटोशूट पाहिलं असेलच. एवढंच कशाला मराठी अभिनेत्रींचंही वेगवेगळे फोटोशूट्स पाहिले असतील. पण आम्ही एम-टाऊनमध्ये नुकतंच पाहिलं एक हटके फोटोशूट.


आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी जुन्या साडीचे ड्रेसेस करण्याची हुक्की येते. लहानपणी आईच्या जुन्या साड्यांचे तर मोठं झाल्यावर स्वतःच्या किंवा सासूबाईंच्या जुन्या साड्यांचे. असंच काहीसं नुकतंच दिसलं एका मराठी अभिनेत्रीच्या फोटोशूटमध्ये. ‘क्लासमेट्स’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून आपल्याला दिसलेली स्टाईलिश अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं.


pallavi-patil-%E0%A5%A9 %281%29


या फोटोशूटमध्ये तिने खास इंडो-वेस्टर्न लुक थीम ठेवली होती आणि या फोटोशूटचं खरं वैशिष्ठ्य म्हणजे यात घातलेले सर्व कॉस्च्युम्स हे तिने स्वत: डिझाईन केलेले आहेत. तेही तिच्या आईच्या साड्यांपासून बनवलेले आहेत.

मराठीमध्ये सध्या अनेक अभिनेत्री अभिनयासोबत डिझाईनर साड्या किंवा स्टायलिंगकडे वळल्या आहेत. त्यामध्येच आता पल्लवी पाटीलचं नावंही सामील झालं आहे. अनेक मराठी चित्रपटात अभिनय केल्यानंतर साड्यांचे ड्रेस डिझाईन करण्याच्या आपल्या आवडीविषयी सांगताना पल्लवी पाटील म्हणाली की, “माझ्या आईच्या अनेक आठवणी तिच्या साड्यांशी निगडीत आहेत आणि त्यामुळेच तिला तिच्या साड्या जुन्या झाल्यावर टाकायला भावनिकदृष्ट्या किती कठीण जातं. हे मी लहानपणापासून पाहत आलीयं. तिच्या साखरपुड्यापासून ते आजवरच्या अनेक घरगुती सण-समारंभांपर्यंतच्या साड्या तिने जपून ठेवल्या आहेत. हे पाहिल्यामूळे माझ्या डोक्यात नामी शक्कल आली की, आईच्या या साड्यांचे ड्रेस बनवले तर स्टाइल, फॅशन, भावना ह्या सगळ्याचीच जपणूक होईल.“


pallavi-patil-%E0%A5%A8


आश्चर्य म्हणजे पल्लवी पाटीलने फॅशन डिझाईनिंगचे कोणतंही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेलं नाही. तरीही तिच्या डिझाईन्सना तिच्या मैत्रिणी आणि जवळच्या लोकांची पसंती मिळते आहे. याबाबत पल्लवी म्हणाली की, “इतर कोणाहीपेक्षा आपल्याला आपल्या शरीराची ठेवण आणि आवड याची जास्त जाण असते. त्यामुळे मला काय साजेसं दिसेल, कोणत्या रंगसंगतीत मी उठून दिसेन, कोणतं मटेरिअल मला चांगलं वाटेल, हे माहीत असल्याने साडीचे ड्रेस शिवताना मला माझ्या कम्फर्टप्रमाणे कपडे शिवता आले. तुम्ही कशा कोणती स्टाइल कॅरी करता यावरून तुमची पर्सनॅलिटी कळते, असं मला वाटतं. “


महाराष्ट्राची शान नऊवारी नेसण्याचे प्रकार


pallavi-patil-1


तसंच ती हेही म्हणाली की, “अवॉर्ड फंक्शन्सच्या रेड कार्पेटवरही मला आता साड्यांचे डिझाईनर ड्रेस घातल्यावर चाहत्यांकडून आणि विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतल्या डिझाइनर्सकडून या कलेसाठी कॉम्प्लिमेन्ट मिळायला लागल्या आहेत. त्यामुळे आता मला साड्यांचे ड्रेस बनवायची ही कला जोपासण्यासाठी अजून हुरूप आला आहे.''


साडी नेसताना या '14' चुका टाळा (Saree Wearing Tips In Marathi)


पल्लवीच्या या साड्यांच्या ड्रेसेसकडे पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की, हे ड्रेसेस साडीपासून शिवलेले आहेत. मात्र तुम्हालाही जुन्या साडीचा एखादा ड्रेस शिवण्याची नक्कीच इच्छा होईल.