खळबळजनक कृत्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पूनम पांडेने केला साखरपुडा

खळबळजनक कृत्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पूनम पांडेने केला साखरपुडा

नेहमी आपल्या खळबळजनक कृत्याने अथवा वक्तव्याने लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री पूनम पांडेने साखरपुडा केल्याचे समोर आले आहे. कित्येक वर्षांपासून असणारा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेबरोबर पूनमने साखरपुडा केला असून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने फोटो शेअर करत ‘सर्वात सुंदर भावना’ अशी कॅप्शन दिली आहे. पूनम पांडे गेल्या कित्येक वर्षापासून बॉलीवूड आणि इतर ठिकाणी आपल्या व्हिडिओ आणि फोटोजने चाहत्यांना घायाळ करत आहे. तिला सोशल मीडियावरही अनेक फॉलोअर्स आहेत. नुकताच आपण साखरपुडा केल्याचे घोषित केले असून तिला अनेकांनी कमेंट्स देत अभिनंदनांचा वर्षाव केला आहे. 

'बिग बॉस'फेम अभिनेत्रीला मिळाला आयुष्याचा जोडीदार, केला खुलासा

सॅमबॉम्बेबरोबर पूनमने केला साखरपुडा

View this post on Instagram

We finally did it!

A post shared by Sam Bombay (@sambombay) on

पूनम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियावरही ती अनेक खळबळजनक व्हिडिओ पोस्ट करत असते. पण आता पूनम पुन्हा चर्चेत आली आहे ते वेगळ्या कारणाने. पूनमने आपला बॉयफ्रेंड सॅमबॉयसह एक असणारा एक फोटो शेअर केला असून आपण साखरपुडा केला असल्याचं सांगितलं आहे. ‘आम्ही शेवटी केलंच’ असं सॅमबॉयने कॅप्शन दिलं असून यावर ‘सर्वांत चांगली भावना’ असं पूनमने म्हटलं आहे. इतकंच नाही तर तिने यासह प्रेमाची इमोजीही शेअर केली आहे. अनेक चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. एका यूजरने म्हटले, ‘मोठ्या निर्णयासाठी तुझे मोठे अभिनंदन’, तर अजून एका चाहत्याने म्हटलं, ‘तू अतिशय नशीबवान पुरूष आहेस कारण पूनम मॅम आता तुझी आहे.’ तर एका चाहत्याने म्हटले आहे की, ‘वाह, अभिनंदन! आनंदी राहा आणि सुखात आयुष्य घालवा’. पूनम पांडे नेहमीच आपल्या वक्तव्य आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. मात्र पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक आयुष्याची सुरूवात अशा तऱ्हेने पूनम पांडे करत असल्याने तिचे चाहतेही तिच्यासाठी आनंदी असल्याचे  दिसून येत आहे. 

सुशांतचा 'दिल बेचारा' लॉकडाऊनमधला सुपर डुपर हिट चित्रपट

मे मध्ये लॉकडाऊन नियम उल्लंघन केल्याचा आरोप

View this post on Instagram

A kiss is greater than a rose.

A post shared by Sam Bombay (@sambombay) on

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरही मे मध्ये पूनम चर्चेत आली होती. पूनम आणि सॅमबॉय यांनी पोलिसांनी घातलेले नियम तोडून लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केले आणि लाँग ड्राईव्हला गेले अशी केस त्यांच्यावर करण्यात आली होती. मात्र यावर पूनमने एका व्हिडिओद्वारे याबाबत खुलासा करत आपण घरातच असून त्यावेळी चित्रपट बघत असल्याचा दावा केला होता. ‘काल रात्री मी मूव्ही मॅरेथॉन बघत होते. लागोपाठ तीन चित्रपट मी पाहिले. मला काल रात्रीपासून मला अटक करण्यात आल्याचे फोन येत आहेत आणि मी चॅनेलवरपण हे पाहत आहे.  पण असं करून नका.  मी घरातच  आहे आणि मी व्यवस्थित आहे. लव्ह यू ऑल’ असं तिने या व्हिडिओद्वारे आपल्या चाहत्यांना सांगितले होते. पूनम पांडेने 2011 च्या वर्ल्ड कपदरम्यान टीम विश्व कप जिंकल्यास संपूर्ण कपडे काढून व्हिडिओ बनविण्याचे वक्तव्य केले तेव्हापासून ती खूपच चर्चेत आली. त्यानंतर 2013 मध्ये ‘नशा’ चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचा सिक्वलही लवकरच बनविण्यात येणार असल्याची चर्चा आहे आणि यामध्येही पूनम पांडेनेच काम करावे अशी इच्छा दिग्दर्शक अमित सक्सेनाने व्यक्त केली होती. 

सुपरस्टार होण्यासाठी या कलाकारांनी बदललं स्वतःचं नाव