ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं 'लॉकडाऊन लग्न', सोशल मीडियावर चर्चा

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं ‘लॉकडाऊन लग्न’, सोशल मीडियावर चर्चा

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतून येसूबाईच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री आता ‘लॉकडाऊन लग्न’ करत आहे. येसूबाईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा प्राजक्ताने उमटवला आहे. पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. प्राजक्ता लग्न करत नाहीये. तर लॉकडाऊन लग्न नावाच्या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत माहिती तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. या मालिकेत प्राजक्ता प्रमुख भूमिकेत असून या नव्या प्रोजेक्टला सुरूवात करत असल्याचे तिने व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे. मात्र तिच्याबरोबर या चित्रपटात कोण कोण असणार हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. पण प्राजक्ता चित्रपटातून दिसणार याचा नक्कीच तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. 

तरीही मालिकांचा ‘शो मस्ट गो ऑन’….कलाकार करत आहेत अविरत काम

‘लॉकडाऊन लग्नाचा’ थाट

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून यामध्ये मास्क आंतरपाट म्हणून धरण्यात आल्याचे दिसून येत आहे. तर त्यावर निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आली आहे. ओवाळणीच्या ताटासह सॅनिटायझर, ऑक्सिमीटरही ठेवण्यात आला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असा वेगळ्या धाटणीचा आणि वेगळ्या विषयाचा चित्रपट या लॉकडाऊन काळातील काही अनुभव घेऊन येणार असल्याचे यावरून दिसून येत आहे. याचे नक्की स्वरूप काय असेल याबाबत आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता तर आहेच. पण कथानक कसे असेल याबाबत आता चर्चाही सुरू झाल्या आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. ‘लॉकडाऊन लग्न’ या आगामी चित्रपटाची कथा ही सुमित संघमित्रा आणि सागर पाठक या दोघांनी लिहिली आहे. तर या चित्रपटातील गाण्यांची चाल ही अभिजित कवठळकर यांनी दिली आहे. लॉकडाऊनमधील हा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस दिग्दर्शकांनी केले आहे. तर या वेगळ्या विषयाला नक्कीच रसिक प्रेक्षक दाद देतील असा विश्वासही सर्वांना वाटतो आहे. 

विद्या बालनच्या ‘शेरनी’चा ग्लोबल प्रिमिअर ‘या’ ओटीटी माध्यमावर होणार प्रदर्शित

ADVERTISEMENT

वेगळ्या भूमिकेत प्राजक्ता

आतापर्यंत प्राजक्ता गायकवाडला ऐतिहासिक भूमिकांमध्येच प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्यामुळे या वेगळ्या विषयावरील चित्रपटातून प्राजक्ता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून प्राजक्ताने निघण्याचा निर्णय घेतला होता. यावरून बराच वाद झाला होता. अभिनेत्री अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यामधील शाब्दिक बाचाबाची सोशल मीडियावर खूपच रंगली होती. त्यानंतर प्राजक्ता गायकवाडने अभिनेता विवेक सांगळे याच्यावर अनेक आरोप लावत ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण यामध्ये नक्की दोष कोणाचा हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पण तरीही प्राजक्ताने आपले पुढचे प्रोजेक्ट्स करायला घेतले आहेत आणि या वादावर पडदा टाकला आहे. प्राजक्ता आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून आपण आपल्या आयुष्यात काय करत आहोत याची माहिती देत असते. त्यामुळे आपल्या नव्या प्रोजेक्टविषयीदेखील प्राजक्ताने सांगितले असून आपण या चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचेही तिने सांगितले आहे. तसंच रसिक प्रेक्षक आपल्याला या नव्या भूमिकेतही स्वीकारतील अशी आशा प्राजक्ताला आहे. 

घरी बसून कंटाळला असाल तर कुटुंबासोबत पाहा या सीरिज

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 May 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT