अखेर कंगनाची मुक्ताफळं थांबवायला रवीना सरसावली, दिले सडेतोड उत्तर

अखेर कंगनाची मुक्ताफळं थांबवायला रवीना सरसावली, दिले सडेतोड उत्तर

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तर कंगना राणौतने सर्वांवरच तोंडसुख घ्यायला सुरूवात केली. काही जण तिला पाठिंबा देत आहेत तर काही जण कंगनाला ‘मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाणारी’ अशी दूषणंही देत आहेत. काही बाबतीत कंगनाची वक्तव्य ठीक असली तरीही काही बाबतीत मात्र कंगनाची जीभ सतत घसरत असल्याचंही दिसून येत आहे. मात्र इंडस्ट्रीतील कोणीही पुढे येऊन तिला काहीही बोलत नसल्याचा कंगना फायदा उचलत असल्याचं आता दिसून येत आहे असंही काही जणांचं म्हणणं आहे. मात्र आता पहिल्यांदाच कंगनाने उधळलेली मुक्ताफळं थांबवायला रवीना टंडन पुढे सरसावली आहे. कंगना सध्या सर्वच स्टारसह ‘पंगा’ घेत असल्याचं दिसून येत आहे. सुशांतच्या केसमध्ये आता ड्रग्जचा मुद्दा पुढे आल्यावरही कंगनाने त्यावर आपली टिप्पणी चालूच ठेवली आहे. इंडस्ट्रीतील 99% लोक ड्रग्ज घेतात असा खळबळजनक आरोप तिने केला आहे. त्यावर रवीना टंडनने आता सडेतोड उत्तर दिले आहे.

संजय लीला भन्सालीला अखेर 'बैजू बावरा' सापडला, 13 वर्षानंतर करणार एकत्र काम

महेश जेठमलानीच्या ट्विटवर रवीनाचे सडेतोड उत्तर

कंगनाच्या ड्रग्जबाबत वक्तव्यावर वरीष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी ट्विट करून ड्रग्जच्या बाबतीत बॉलीवूड सेलिब गप्प का आहेत असा प्रश्न उपस्थित केला. ‘एक अभिनेत्रीने टीव्हीवर दावा केला की इंडस्ट्रीतील 99% लोक ड्रग्ज घेतात. इंडस्ट्रीतल्या कोणत्याही व्यक्तीने याचा विरोध का केला नाही. गप्प राहिल्याने लोकांपर्यंत नक्की काय मेसेज जाईल.’ अशा स्वरूपाचे ट्विट जेठमलानी यांनी केले असता बॉलीवूडची ‘मस्त गर्ल’ रवीनाने यावर चुप्पी तोडत कंगनाला एक प्रकारे फटकारले आहे. रवीनाने या ट्विटला उत्तर देत म्हटले, ‘99% न्यायाधीश, नेता, बाबू, अधिकारी आणि पोलीस हे भ्रष्टाचारी असतात, असं जर कोणी म्हटलं तर हे एक मत असू शकत नाही. लोक समजूतदार आहे. चांगल्या आणि वाईटातील फरक त्यांना कळू शकतो. काही खराब सफरचंद पूर्ण भरलेल्या टोकरीमधील सफरचंद खराब करू शकत नाहीत. तसंच आमच्या इंडस्ट्रीतही काही चांगले आणि काही वाईट लोक आहेत.’

स्टार असूनही या प्रसिद्ध अभिनेत्रीला द्यावी लागली ऑडिशन, शेअर केला अनुभव

काय होते कंगनाचे वक्तव्य

दर दोन दिवसांनी कंगना कोणाला ना कोणाला तरी टारगेट करत आहे. कंगनाने वक्तव्य केले होते की, ‘काही तरूण कलाकार जे माझ्या वयाचे आहेत, ते व्यक्तीगत स्वरूपात ड्रग्ज घेतात आणि शो करतात. या कलाकारांच्या बाबतीत ब्लाईंड गोष्टीही लिहिण्यात आल्या आहेत. सर्व काही एका विशिष्ट स्वरूपात व्यवस्थापित करण्यात येतं. या पार्टीजमध्ये त्यांच्या पत्नीही असतात. एक वेगळंच वातावरण असतं. तुम्हाला असे अनेक लोक भेटतील, जे केवळ ड्रग्ज घेतात आणि दुसऱ्यांशी दुर्व्यवहार करतात.’ गेल्या दोन महिन्यात कंगना सतत स्टारकिड्स, करण जोहर आणि इंडस्ट्रीतील अनेक लोकांवर आगपाखड करत आहे. तिच्या या वक्तव्यांमुळे सर्वच जेरीला आले असल्याचं सध्या दिसून येत आहे. मात्र कोणीही तिच्या नादी लागण्याचा प्रयत्न करत नाही असंही दिसून आलं आहे. पण यावेळी मात्र रवीना टंडनने ‘लेकी बोले सुने लागे’ अशा तऱ्हेने उत्तर दिले आहे. आता यानंतर पुन्हा कंगना काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

बिग बींची नात 'नव्या नवेली' या आजारावर घेत होती उपचार, उघड केली स्ट्रगल स्टोरी

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा