बिग बॉस मराठी 2 चा सिझन नुकताच संपला. बिग बॉस मराठीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमध्ये अनेक बदल झाल्यामुळे प्रेक्षकांचं मन खेळापेक्षा या तुलनेत जास्त रमलं. पहिल्या भागात एक नाव सतत चर्चेत होतं ते म्हणजे रेशम टिपणीस. तिच्या बोल्ड आणि बेधडक अंदाजामुळे तिने पहिल्या सिझनमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. रेशम टिपणीस बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावरदेखील सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. नुकतंच तिने तिच्या एका आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आहे. तिच्या इंन्सा अकाउंटवरून तिने तिचे या चित्रपटाच्या स्टारकास्टसोबत असलेलेल काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रेशम अभिनेता अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, वैदेही परशुराम अशा कलाकारांसोबत दिसत आहे. शिवाय हे शूटिंग सध्या बर्हिंगम या ठिकाणी सुरू असल्याचं रेशमने सांगितलं आहे. रेशमने या चित्रपटाच्या शूटिंगचे अनेक फोटो शेअर केले आहेत मात्र त्यावरून ती कोणत्या चित्रपटात काम करत आहे हे मात्र समजत नाही आहे. मात्र सर्व कलाकार आणि रेशमाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून येत्या काळात एखाद्या चांगला चित्रपट प्रेक्षकांना पाहता येईल असं नक्कीच वाटत आहे.
सध्या या ठिकाणचं वातावरण जवळजवळ फक्त तीन अंश सेल्सिअस असून इतक्या थंड वातावरणात हे कलाकार शूटिंग करत आहेत. ही माहिती स्वतः रेशमने तिच्या फोटोसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये हे कलाकार शूटिंगसोबतच तिथल्या वातावरणाचा आनंद लुटतानादेखील दिसत आहेत. रेशमने या फोटोंसोबत तिच्या जुन्या मित्राचा आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा फोटोदेखील शेअर केला आहे. ज्या फोटोसोबत तिने लिहलं आहे की, "जेव्हा तुमचा जुना मित्र त्याचा दुसरा चित्रपट दिग्दर्शित करतो आणि त्या चित्रपटात तुमची भूमिका असते तेव्हा नक्कीच अभिमानास्पद वाटतं."
रेशम अभिनेत्री सोबत पहिल्यांदाच काम करत आहे. त्यामुळे तिने तिच्यासोबत काम करताना आलेला अनुभवदेखील शेअर केला आहे. याबाबत रेशमने शेअर केलं आहे की, "जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत पहिल्यांदा काम करता आणि ती व्य्क्ती तुमच्यासोबत आयुष्यभराशी जोडली जाते."
रेशम टिपणीसने तिच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजन मालिकांमधून केली. तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधून काम केलं आहे. शिवाय अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधूनही आपण रेशमला पाहिलेलं आहे. गोड चेहरा आणि निरागस हास्य यामुळे रेशम नेहमीच प्रेक्षकांच्या मनात राहिली. मात्र काही वर्षांपासून ती चित्रपट आणि टेलिव्हिजन माध्यमातून कमी दिसू लागली होती. मागच्या वर्षी बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये सहभागी झाल्यामुळे रेशम पुन्हा एकदा चर्चेत आली. रेशम आता तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच खुशखबर आहे. ज्यामुळे रेशमला पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत पाहता येणार आहे.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा -
ऐश्वर्या राय बच्चन बनणार अँजेलिना जोलीचा आवाज