'किन्नर बहू' रुबीना दिलैकला झाला शूटींगदरम्यान अपघात

'किन्नर बहू' रुबीना दिलैकला झाला शूटींगदरम्यान अपघात

कलर्स टीव्हीवरील प्रसिद्ध सीरियल "शक्ती- अस्तित्व के एहसास की" मधील किन्नर बहू सौम्याची भूमिका करणारी अभिनेत्री रूबीना दिलैक टीव्ही इंडस्ट्रीतील एक चांगलंच परिचित नाव आहे. इन्स्टावर रूबीनाचे तब्बल 10 लाख फॉलोअर्स आहेत. आपल्या फॅन्ससाठी रूबीना नेहमीच इन्स्टावर पोस्ट शेअर करत असते.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Obsessing and Loving the Phulkaaris u got @srishtyrode24 🥰😘😘😘😘


A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik) on
मग ते वेकेशनचे फोटोज असोत वा डान्स व्हिडीओज असोत. आपला अभिनय आणि अदांनी रूबीनाने फॅन्सना वेडं लावलं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे. पण आता मात्र रूबीनासोबत असं काही झालं आहे ज्यामुळे तिला डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे.   


कसौटी जिंदगी की : प्रेरणाचं हृदय जिंकण्यासाठी आता नवी एंट्री


शूटींगदरम्यान झाला अपघात

खरंतर काही दिवसआधी अभिनेत्री रूबीना दिलैकसोबत सेटवर एक अपघात झाला. सीरियल "शक्ति- अस्तित्व के एहसास की" च्या शूटींगदरम्यान तिच्या डाव्या हाताला जखम झाली. ज्याचे फोटोज तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर फॅन्ससोबत शेअर केले होते. या फोटोजमध्ये रूबीनाच्या दोन्ही हातांना बँडेज दिसत होतं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

🥴


A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik) on
पण त्यावेळी रूबीना तिच्या जखमेकडे जास्त लक्ष दिलं नाही. रोज शूटला येण्यामुळे डॉक्टरकडूनही याबाबत ती सल्ला घेऊ शकली नाही आणि नंतर हाताचं दुखणं वाढलं. आताही जखम तिच्यासाठी संकटच झाली आहे. या जखमेमुळे रूबीनाला शूटींग करताना त्रास होत आहे. हात दुखत असल्यामुळे रूबीनाने डॉक्टरांना हात दाखवला असता त्यांनी रूबीनाला सर्जरी करायचा सल्ला दिला आहे. आता तिला लवकरच तिच्या जखम झालेल्या हातावर सर्जरी करावी लागेल.


'कसौटी जिंदगी की' ची 'प्रेरणा' श्वेता तिवारीचं पुन्हा टीव्हीवर कमबॅक


गाणं गायल्याने झाली होती ट्रोल


काही दिवसांपूर्वी रूबीना दिलैकने आपल्या आवाजातील एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने आपला नवरा अभिनव शुक्ला आणि मित्रांसोबत गाडीतून प्रवास करत होती. हा व्हिडीओ तिने इन्स्टावर शेअर करताच तिच्या गाण्यावरून तिला बरंच ट्रोल करण्यात आलं आणि आश्चर्य म्हणजे रूबीनाने या कमेंट्सना हाईलाईट करून आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअरही केलं.


Rubina Dilaik surgery 2


कसौटीतून कुठेही जाणार नाही कमोलिका, एकता कपूरचा खुलासा


आता तुम्हीच पाहा 'किन्नर बहू' रुबीना दिलैकचा हा व्हिडीओ, ज्यामध्ये आपल्या सुरांची जादू दाखवण्याचा प्रयत्न करताना रूबीना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा की, तुम्हाला हे गाणं आवडलं की नाही ते.
 

 

 


View this post on Instagram


 

 

9 months ♥️.....


A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik) on