पाहा अभिनेत्री समीरा रेड्डीच्या बेबी शॉवरचे सुंदर फोटोज

पाहा अभिनेत्री समीरा रेड्डीच्या बेबी शॉवरचे सुंदर फोटोज

बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिचं बेबी शॉवर नुकतंच पार पडलं. या पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या डोहाळेजेवणाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोजमध्ये समीरा फारच सुंदर दिसत आहे.

समीराचा ट्रेडिशनल लुक

समीराने बेबी शॉवरसाठी खास ट्रेडीशनल लुक केला होता. तिने पिवळ्या रंगाची सुंदर अशी कांजीवरम साडी नेसली होती आणि गळ्यात डायमंडचा चोकर, त्याला मॅचिंग कानातले घातले होते. हेअरस्टाईलमध्येही तिने मिड पार्टीशन करून लो बन आणि त्यावर सुंदर गजरा माळला होता. बेसिक रेड लिपस्टीक आणि छोटीशी टिकली असा तिचा बॅलन्स्ड लुक होता. तिचा हा मेकअप प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनीने केला होता.

समीराचा आनंद गगनात मावेना

समीराने आपल्या नवऱ्यासोबत आणि पहिल्या मुलासोबत सुंदर फोटोही काढले आहेत. या फोटोशूटसाठी समीरा फारच एक्सायटेड दिसत होती. हा संपूर्ण सोहळा सर्व पारंपारिक विधी करून पार पाडण्यात आला. तसंच या सोहळ्यासाठीचा मेन्यूही अगदी पारंपारिक होता.

समीराचा बेबीमून आणि ग्लॅमरस फोटोशूट

समीराने आपली प्रेग्नंसी जर्नी खूपच एन्जॉय केली आहे. तिने बेबीमूनसाठी गोव्याची निवड केली होती. जिथे तिने बेबी बंप दाखवत बोल्ड फोटोशूटही केलं. समीरा सोशल मीडियावर आपलं बेबी बंप फ्लॉंट करत अनेक फोटो शेअर केले आहेत.

नुकतंच समीराने मॅटर्निटी फोटोशूटही केलं होतं. ज्यामध्ये फारच ग्लॅमरस दिसत होती. हे फोटोज आणि व्हिडीओही तिने इन्स्टावर शेअर केले. हे फोटो तिच्या फॅन्सनाही खूपच आवडले असून वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

समीराने दिलं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

वर सांगितल्याप्रमाणे समीरा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. गेल्या काही वेळापासून प्रेग्नंसीदरम्यान वाढलेल्या वजनामुळे तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. एका इव्हेंट दरम्यान तिने बॉडी शेमिंग करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आणि कठोर शब्दात त्यांची निंदाही केली. समीराने म्हटलं की, मी या लोकांना विचारू इच्छिते की, ते कुठून जन्माला आले आहेत. एका आईच्याच पोटातून जन्म घेतला असेल ना, मग त्यांची आईही त्यावेळी खूप हॉट होती का? त्यांना लाज वाटली पाहिजे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी खूपच सुंदर आणि अविस्मरणीय असते.  

समीरा रेड्डी बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. तिचा शेवटचा सिनेमा 6 वर्षापूर्वी आला होता जो कन्नड भाषेत होता. ज्याचं नाव होतं वरदनायका. तिने बिझनेसमन अक्षय वर्डेसोबत लग्न केलं आहे. समीराने 25 मे 2015 ला पहिला मुलगा हंसला जन्म दिला. तर तिची दुसरी डिलेव्हरी जुलै महिन्यात होणार आहे.

हेही वाचा -

धमालमस्ती करत ईशा देओलचं दुसरं 'बेबी शॉवर'

Good News: ‘हेट स्टोरी’ फेम सुरवीन चावलाच्या घरी आली ‘ईवा’