Bigg Boss फेम सना खानने फिल्म इंडस्ट्रीला केला अलविदा

Bigg Boss फेम सना खानने फिल्म इंडस्ट्रीला केला अलविदा

Bigg Boss मधून घराघरात पोहोचलेली सना खान आजही अनेकांच्या लक्षात असेल. तिची स्टाईल, तिची अदा आणि अभिनय या सगळ्यामुळे बिग बॉसनंतरही तिचा बोलबाला कायम राहिला. पण इतकी सगळी प्रसिद्धी मिळवून आता तिला या क्षेत्रापासून दूर जायचे आहे. सनाने मनोरंजन इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हो! वाचून तुम्हालाही धक्का बसेलच की अचानक सना खानला झाले तरी काय? पण सनावर कोणत्याही प्रकारे जबरदस्ती झाली नाही तर तिने स्वत:हून हा निर्णय घेतला आहे. तिने या संदर्भातील ऑफिशिअल घोषणा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केली असून या मागचे कारणही सांगितले आहे. जाणून घेऊया सना खानने का घेतला इतका मोठा निर्णय

मराठीतील ज्येष्ठ अभिनेता अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

इस्लाम धर्मासाठी सोडले क्षेत्र

सनाने तिच्या सोशल मीडियावर एक भली मोठी नोट लिहली आहे. त्यामध्ये तिने इंडस्ट्री सोडण्याचा उल्लेख केला आहे. ती म्हणते की, आतापर्यंत मला प्रमे, पैसा, ओळख असे सगळे काही  मनोरंंजन इंडस्ट्रीतून मिळाले.पण माझ्या मनात खूप दिवसापासून काही विचार सुरु आहेत. आपला जन्म का होतो? या जगात आपण आहोत याचा काहीतरी उद्देश आहे. फक्त पैसा कमावणे हा त्याचा उद्देश असू शकतो का?  पैसा कमावून ज्यांना त्याची गरज आहे त्यांना मदत करणे असा होऊ शकत नाही का?  आपण हा विचार करायला हवा की,मृत्यू हा कधीही येऊ शकतो. पण मेल्यानंतर आपली ओळख काय असेल? या प्रश्नांनी मला ग्रासले आहे. त्याची उत्तर शोधण्याचा मी देखील प्रयत्न करत आहे. विशेषत: दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर की मेल्यानंतर माझे काय होईल. 

 पुढे सना म्हणते की, या प्रश्नाचे उत्तर ज्यावेळी मी माझ्या धर्मात शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मला हे कळले की, मेल्यानंतरच आयुष्य अधिक चांगले बनवण्यासाठी हे आयुष्य आहे. या आयुष्यापेक्षा ते आयुष्य अधिक चांगले असेल. त्यामुळेच आज मी असे सांगू इच्छिते की, मी शो-बिजमधून कायमची बाहेर पडत माणुसकीच्या सेवेसाठी काम करण्याचा विचार पक्का करत आहे. त्यामुळे आता मला मनोरंजन क्षेत्रातील कोणत्याही कामासाठी बोलावू नये. तुमचे आभार!

आठवड्याभरात बिग बॉस 14 गाजवणारी मराठमोळी निक्की तांबोळी नक्की आहे कोण

सनाने जुने फोटो केले डिलीट

Instagram

सनाची प्रोफाईल आता पाहिल्यानंतर तिने त्यामध्ये बरेच बदल केले आहेत असे दिसत आहे. सनाने तिचे सगळे जुने फोटो डिलीट करुन टाकले आहेत. विशेषत: ग्लॅमरस फोटो तिने काढून टाकले आहेत आणि फक्त हिजाब आणि इस्लाम धर्माचा मान राखेल असेच फोटो तिने या प्रोफाईलमध्ये ठेवले आहे. सना गेल्या काही दिवसांपासून ब्युटी इंडस्ट्रीशी निगडीत आहे. ती स्किन क्लिनिक चालवते. त्यामुळे तिच्या या काही पोस्ट प्रोफाईलवर दिसत आहेत..

2005 साली केला डेब्यू

सना खान 2005 सालापासून इंडस्ट्रीशी निगडीत आहे. तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.  बॉम्बे टू गोवा, धना धन गोल, जय हो, वजह तुम हो अशा चित्रपटांमधून तिने काम केले आहे. तिची बोल्ड स्टाईल आणि फॅशन पाहता. बिग बॉससारख्या रिअॅलिटी शोमधअये आल्यानंतरही तिचा बराच बोलबाला होता. ती अनेक साऊथच्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. तिच्या सौंदर्यामुळे आणि मादक अदांमुळे तिचे अनेक चाहते आहेत. 


आता तिच्या या निर्णयामुळे तिच्या असंख्य फॅन्सना धक्का बसला आहे. 

कोरोना काळात 'या' अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, दोन महिन्याने केले जाहीर