सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेली आणि करोडोंच्या हृदयात स्थान मिळवलेली बबली गर्ल अभिनेत्री संस्कृती बालगुडेला (Sanskruti Balgude) नुकतंच डिजीटल इन्फ्लुएन्सर्स पुरस्काराने गौरवण्यात आलंय. नुकताच डिजीटल इन्फ्लुएन्सर्स पुरस्कार सोहळा झाला. त्यामध्ये संस्कृतीला ‘युथ आयकॉन- डिजीटल इन्फ्लुएन्सर ’ या सन्मानाने गौरवण्यात आले आहे. संस्कृतीसाठी ही नक्कीच अभिमानस्पद बाब आहे. सोशल मीडियावर संस्कृती नेहमीच अॅक्टिव्ह दिसून येते. आपल्या फॅशनने आणि आपल्या अदांनी संस्कृतीने चाहत्यांना नेहमीच घायाळ केले आहे. मराठीतील दिवा (Diva) अशीच संस्कृती आहे. आधुनिक असो अथवा पारंपरिक कोणत्याही पोषाखात संस्कृतीत तितकीच बिनधास्तपणे वावरताना दिसून येते आणि तिला सोशल मीडियावर फॉलो करणारे चाहतेही अनेक आहेत.
राहुल वैद्य आणि दिशा परमार करणार 16 जुलैला लग्न
पुरस्कार मिळणे अनपेक्षित – संस्कृती
पुरस्कार मिळाल्यानंतर संस्कृती म्हणाली की,” हा पुरस्कार मला मिळणे हे माझ्यासाठी अनपेक्षितच होतं. पण या पुरस्कारांच्या परीक्षकांना मी या पुरस्कारासठी पात्र वाटले, याबद्दल मला अतिशय आनंद वाटतोय.“ पुरस्कारानंतर भारावून जात ती पुढे म्हणाली, “डिजीटल इन्फ्लुएन्सर म्हणवलं जाणं ही गोष्टचं मुळात माझ्यासाठीही खूप अप्रुप वाटणारी आहे. त्यात युथ आइकन डिजीटल इन्फ्लुएन्सर असा माझा पुरस्कार व्हावा , ही तर खूपच अभिमानाची बाब आहे. मी माझ्या सोशल मीडियावर खूप विचारपूर्वक पोस्ट टाकते आणि माझ्या पोस्टसची दखल घेतली जातेय, याचीच पोचपावती डिजीटल इन्फ्लुएन्सर या पुरस्काराने मला मिळाली असं मी समजते” त्यानंतर संस्कृतीने पुढे सांगितले की, “मला नेहमी असं वाटतं की जर माझ्या सोशलमीडिया प्रोफाईलवर कोणी आलं आणि प्रोफाईल स्क्रोल केलं, तर समोरची व्यक्ती प्रभावित झाली पाहिजे. ज्या गोष्टींमध्ये मी पारंगत आहे, म्हणजे अभिनय, नृत्य, चित्रकला ह्या गोष्टींविषयी माझ्या प्रोफाइलवर पोस्ट अधिक व्हायला पाहिजेत. आता या पुरस्काराने सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना अजून जास्त जबाबदारीने वागायला हवं याची जाणीव झाली आहे.” एकंदरीतच सध्या संस्कृती अतिशय आनंदी असून आता अजून पुढे जबाबदारीने पोस्ट करत आपल्या चाहत्यांना नक्कीच ती आनंदी ठेवणार यात वाद नाही.
आणखी एक स्टार किड पदार्पणाच्या मार्गावर, आहे या ज्येष्ठ अभिनेत्याचा नातू
सालस आणि बोल्ड असे कॉम्बिनेशन
संस्कृतीच्या प्रोफाईलवर गेल्यानंतर सालस आणि बोल्ड अशा दोन्ही भावना मनात येतात. कोणत्याही पोषाखात संस्कृती अप्रतिम आणि सुंदर दिसते. कुठेही अति अंगप्रदर्शन नाही आणि तरीही दिसायला तितकीच बोल्ड अशी संस्कृती बालगुडे अनेकांना आवडते. मराठी मालिका ‘पिंजरा’ मधून घराघरात पोहचलेली संस्कृती अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस आहे. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘जून’ या चित्रपटातही तिची लहानशी मात्र लक्षात राहणारी भूमिका आहे. अभिनयासह संस्कृती नृत्यातही निपुण आहे. आपल्या नृत्याचे व्हिडिओदेखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नृत्याचे शो देखील संस्कृती करते. सध्या संस्कृती आपल्या कामात व्यग्र असून लवकरच सुश्रुत भागवतच्या ‘8 दोन 75’ या चित्रपटात अभिनेता शुभंकर तावडे याच्यासह दिसणार आहे. नुकतेच पाण्यातील केलेले संस्कृतीचे फोटोशूटही व्हायरल झाले होते. यामध्ये संस्कृतीच्या अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ केले. तसंच लवकरच तिला टीव्हीवरही रोज पाहता यावं अशीही तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र पुढील कोणते प्रोजेक्ट आपण करत आहोत याविषयी अजूनही संस्कृतीने काहीही सांगितलेले नाही.
संस्कृतीच्या सौंदर्याने केले चाहत्यांना घायाळ, फोटो व्हायरल
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक