ADVERTISEMENT
home / मनोरंजन
संस्कृतीच्या सौंदर्याने केले चाहत्यांना घायाळ, फोटो व्हायरल

संस्कृतीच्या सौंदर्याने केले चाहत्यांना घायाळ, फोटो व्हायरल

मराठीतील अनेक तारका आहेत ज्यांनी आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि त्यातील एक तारका म्हणजे संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude). सोशल मीडियावर संस्कृतीचे तुफान फॅन फॉलोईंग आहे आणि संस्कृती नेहमीच वेगवेगळे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने पाण्यात केलेले फोटोशूट आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे आणि तिचे हे हॉट फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ‘रे राया’फेम ही अभिनेत्री या फोटोंमध्ये अत्यंत सुंदर आणि मादक दिसत असून काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालेला दिसून येत आहे. 

बाळाच्या जन्मानंतर नागिन फेम या अभिनेत्रीने करिअर सोडल्याच्या चर्चांना जोर

अभिनेत्री संस्कृती बालगुडेचे पाण्यातील फोटोशूट व्हायरल, स्टनिंग फोटोज

संस्कृती नेहमीच आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. कधी साडी, कधी वनपिस अशा वेगवेगळ्या पोषाखात संस्कृती उत्तम दिसते. दरम्यान यावेळी मात्र संस्कृतीने पाण्यातील काही आपले फोटो शेअर केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण कपडे असलेले हे फोटो तितकेच मादक आणि सुंदर आहेत. संस्कृतीचे हे सौंदर्य वैभव राजामणी या फोटोग्राफरने टिपले आहे. पाण्यातील सौंदर्य हे केवळ बिकिनीमध्येच दाखवता येते असं नाही तर अगदी पूर्ण कपड्यांमध्येही व्यक्ती तितकीच सुंदर दिसू शकते हेच जणू संस्कृतीच्या या फोटोंवरून दिसून येत आहे. सुयश टिळक, सिद्धार्थ मेनन या तिच्या मित्रांनीही तिला या फोटोंसाठी कमेंट्स दिल्या आहेत. तसंच संस्कृतीच्या अनेक चाहत्यांनीही तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव करत ती या फोटोंमध्ये अत्यंत स्टनिंग आणि सुंदर दिसत असल्याचे सांगितले आहे. अत्यंत माफक मेकअप, सौंदर्य आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ असेच हे फोटो आहेत असं म्हणटलं तर वावगं ठरणार नाही. संस्कृतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत. 

अभिनेत्री हिना पांचाळला झाली अटक, जाणून घ्या कारण

ADVERTISEMENT

हॉट आणि ग्लॅमरस संस्कृती

‘पिंजरा’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली संस्कृती अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस आहे. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘जून’ या चित्रपटातही तिची लहानशी मात्र लक्षात राहणारी भूमिका आहे. अभिनयासह संस्कृती नृत्यातही निपुण आहे. आपल्या नृत्याचे व्हिडिओदेखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नृत्याचे शो देखील संस्कृती करते. सध्या संस्कृती आपल्या कामात व्यग्र असून लवकरच सुश्रुत भागवतच्या ‘8 दोन 75’ या चित्रपटात अभिनेता शुभंकर तावडे याच्यासह दिसणार आहे. संस्कृतीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. पारंपरिक वा आधुनिक अशा कोणत्याही कपड्यांमध्ये संस्कृती स्वतःला उत्तमरित्या कॅरी करताना दिसून येते. तिच्या कोणत्याही फोटोमधून तिचा आत्मविश्वास आणि तिचे ग्लॅमर दिसून येते. आता या फोटोशूटनंतर पुढे कोणत्या नव्या थीमवर संस्कृतीचे फोटोशूट असणार याचीही तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. तसंच लवकरच तिला टीव्हीवरही रोज पाहता यावं अशीही तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र पुढील कोणते प्रोजेक्ट आपण करत आहोत याविषयी अजूनही संस्कृतीने काहीही सांगितलेले नाही. पण तिच्या फोटोंमुळे मात्र तिचे चाहते नक्कीच आनंदी असतील.

सारेगमप लिटिल चॅम्प मंचावर रंगणार लोकसंगीताचा जागर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Jun 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT