प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्या कार अपघाताबाबत ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला होता. कारण आदल्या दिवशीच लेखक-गीतकार जावेद अख्तर यांच्या 75 व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. त्यासाठी खास थीम पार्टीही ठेवण्यात आली होती. त्यानंतर अचानक अपघाताच्या आलेल्या या बातमीने सगळेच हादरले.
शबाना यांच्या अपघाताचे फोटो आणि अपघातानंतरचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये शबाना फारच गंभीररित्या जखमी झाल्याचं दिसत होतं. यामुळे त्यांच्या फॅन्सनाही तब्येतीबाबत जाणून घ्यायची इच्छा होती. म्हणूनच अखेर जावेद अख्तर यांनी स्टेटमेंट जाहीर केलं.
आपल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की, शबाना यांना शरीरात अंतर्गत कोणतीही जखम झालेली नाही. त्यांची प्रकृती स्थिर असून तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या शुभचिंतकांच्या प्रार्थनेमुळे आता त्यांना बरं वाटत आहे. जावेद अख्तर यांच्याआधी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर आणि सीईओ डॉ. संतोश शेट्टी यांनी शबाना यांच्या तब्येतीबाबत सांगितलं होतं की, त्यांची प्रकृती स्थिर असून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
सोशल मीडियावर अनेक सेलेब्सनी शबाना यांना बरं वाटावं म्हणून सदिच्छा तर दिल्याच. तसंच मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केल्यावर भेटही दिली. या सेलेब्समध्ये अनिल कपूर, शबाना आझमी यांची भाची आणि अभिनेत्री तब्बू, फराह नाज, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, उद्योगपती अनिल अंबानी, टीना अंबानी, सतीश कौशिक यांना स्पॉट करण्यात आलं.
शबाना आझमी यांच्या कारचा अपघात 18 जानेवारी झाला होता. हा अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेसवे झाला. शबाना यांच्या कार आणि ट्रकची धडक झाली ज्यामध्ये त्या गंभीररित्या जखमी झाल्या. अपघातानंतर खालापूरमध्ये ट्रक ड्रायव्हरने शबाना आझमी यांच्या कार ड्रायव्हरविरोधात तक्रार दाखल केली. या ट्रक ड्रायव्हरने आरोप केला आहे की, रॅश ड्राईव्हींगमुळे कार आणि ट्रकमध्ये धडक झाली. त्यावेळी शबाना यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. तर दुसरीकडे पोलिसांनीही शबाना आझमी यांच्या ड्रायव्हर विरोधात मोटर वाहन कायदा कलमाअंतर्गत 279 आणि 337 तक्रार दाखल केली आहे.
अनेक सेलेब्सप्रमाणेच अभिनेत्री उर्वशी रौटेलानेही ट्वीट केलं पण तिला ते ट्वीट महागात पडलं. कारण ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधत तिला केलं ट्रोल. यामागचं होतं तिने केलेलं कॉपी-पेस्ट. झालं असं की, उर्वशीने तेच ट्विट कॉपी केलं जे एक दिवसआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. ज्यामुळे लोकांनी तिला लगेच ट्रोल करायला सुरूवात केली.
कोणाचं काय तर कोणाचं काय. आम्ही फक्त एवढीच प्रार्थना करतो की, अभिनेत्री शबाना आझमी यांना लवकरात लवकर बरं वाटावं.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.