प्रत्येक आजीला आपली नातवंड प्रिय असतात. असंच काहीसं आहे बॉलीवूडच्या फेमस स्टार किड्सची आजी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याबाबत. एकीकडे नात सारा अली खानचं करिअर आता जोरदार सुरू झालंय तर दुसरीकडे नातू तैमूर तर जन्मल्यापासूनच पापाराझ्झींचा फेव्हरेट आहे. मग या आजीला आपल्या नातवंडांबाबत काय वाटतं हे जाणून घ्यायची संधी नुकतीच मीडियाला मिळाली.
माझ्या बायोपिकमध्ये साराने काम करावं
नुकत्याच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी उपस्थिती लावली होती.
View this post on Instagram
या दरम्यान शर्मिला यांनी सांगितलं की, सध्या त्यांनी बायोग्राफी लिहण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी असं सांगताच मीडियाने त्यांना यावर बायोपिक आल्यास त्यात कोणत्या अभिनेत्रीने काम करावं असं विचारलं असता, त्या म्हणाल्या की, जर एखाद्या निर्मात्याला ही कहाणी आवडली तर बायोपिक नक्कीच बनवावं. माझी भूमिका सारा नक्कीच करू शकते. सारा आपल्या आईसारखी दिसते आणि तिच्या आईसारखीच ती एक चांगली अभिनेत्री आहे. मी तिच्या अभिनयाबाबत खूश आहे. ती जितकी चांगली अभिनेत्री तितकीच चांगली व्यक्तीही आहे. तिचा प्रत्येक इंटरव्ह्यू पाहताना मला ती विनम्र आणि सभ्य वाटते. मला साराबाबत गर्व आहे.
View this post on InstagramHappy Diwali and a prosperous New Year!!✨🎉💫🌟💥 #likemotherlikedaughter #gotitfrommymama
साराच्या प्रोफेशनल लाईफबाबत सांगायचं झाल्यास 'केदारनाथ' आणि 'सिंबा' नंतर लवकरच ती 'लव आजकल 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार आहे. नुकतंच या जोडीला दिल्लीमध्ये टू व्हीलरवर फिरताना पाहण्यात आलं होतं.
तैमूरबाबत मला चिंता वाटते
एकीकडे शर्मिला आजीने साराचं कौतुक केलं तर तैमूरबाबत मात्र तिला चिंता सतावते आहे. कारण मीडियाचा फेव्हरेट असणाऱ्या तैमूर अली खान नेहमीचं काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. मग त्याचा लेटेस्ट हेअरकट असो वा अगदी गावच्या गोठ्यात गाईला हात लावणं असो. त्याचा कोणताही फोटो किंवा व्हीडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतो. त्यामुळे आपल्या नातवाबद्दल आजी शर्मिलाला चिंता वाटणं साहाजिक आहे.
शर्मिला यांचं काय म्हणणं आहे याबाबत, ज्या पद्धतीने तैमूर सदैव मीडियाने घेरलेला असतो. त्याबाबत आपण काहीच करू शकत नाही. कारण हा सोशल मीडियाचा जमाना आहे. पण हे तैमूरच्या बालपणासाठी योग्य नाही. कारण लाईमलाईटशी अॅडजस्ट व्हायला तो खूपच छोटा आहे. मी तर जुन्या काळातली आहे, त्यामुळे मला तरी वाटतं की, लहान मुलांना यापासून दूरच ठेवलेलं बरं.
आपल्या नातंवडांबद्दल सारा आणि तैमूरबाबतच आजी शर्मिलाचं प्रेम यातून पुन्हा एकदा दिसून आलं.
फोटो सौजन्य : Instagram
हेही वाचा
तैमूर की सारा अली खान कोण आहे सर्वाधिक लोकप्रिय