अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मालदीव्समध्ये करतेय रोमान्स

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मालदीव्समध्ये करतेय रोमान्स

#NewlyMarried शर्मिष्ठा राऊत तिच्या लग्नापासून फारच चर्चेत आहे. तिच्या लग्नाचा प्रत्येक लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता शर्मिष्ठाचे आणखी काही फोटोज सोशल मीडियावर तिच्या फॅन्समध्ये चांगलेच हिट होत आहेत. शर्मिष्ठा राऊत तिच्या हनिमूनसाठी सध्या मालदीव्सला गेली असून तेथील सुंदर फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकतेच शेअर केले आहेत. तिचा नवरा तेजस देसाईसोबत ती मालदीव्सच्या किनाऱ्यावर आपला क्वालिटी टाईम घालवत रोमान्स करताना दिसत आहे. पाहुयात तिचे मालदीव्समधील खास फोटो

वरूण धवननंतर आता श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बंधनात

मज्जानू लाईफ

लग्नानंतर नवऱ्यासोबत हनिमूनला जाण्याचे स्वप्न प्रत्येकीचं असतं. जोडीदाराला जास्तीत जास्त जाणून घेणारा हा क्षण शर्मिष्ठाही तितक्याच आनंदाने घालवताना दिसत आहे. हा प्रवास तिच्यासाठी फारच खास असल्याचे दिसत आहे. अगदी एअरपोर्टा लुकपासून ते मालदीव्सच्या सुंदर किनाऱ्यांपर्यंत तिने सगळे फोटो यामध्ये शेअर केले आहेत. अगदी मालदीव्सला पोहोचल्यापासून ते मालदीव्सच्या किनाऱ्यावर वाईन्सचा आनंद घेतानाच्या पोस्ट आणि स्टोरीज तिने टाकल्या आहेत. तिचा हा आनंद पाहून तिचे फॅन्सही फारच आनंदी आहेत. तिचे हे सगळे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मालदीव्सला पोहोचल्यापासून तिने काही पोस्ट शेअर करत #honeymoon असा हॅशटॅगही वापरला आहे. त्यामुळे सध्या तरी हे जोडपं मस्त मज्जानू लाईफ जगत आहे.

लॉकडाऊनच्या काळात पार पडले सोहळे

2020 हे अनेकांसाठी आनंदाचे होते. आता शर्मिष्ठाचेच पाहा ने शर्मिष्ठाचा साखरपुडा हा ऐन लॉकडाऊनच्या काळात जून महिन्यात झाला.  अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडला. तिच्या साखरपुड्याच्या दिवसापासूनच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. साखरपुड्यातील तिचा लुक ते तिच्या लग्नाच्या वेगवेगळ्या लुकची सगळीकडे चर्चा होती. ऑक्सिडाईज दागिने आणि पैठणी असं कॉम्बिनेशन करत तेजस आणि शर्मिष्ठा या दोघांनी एक शूट एकत्र केले. हा फोटो देखील अनेकांना आवडला. 

वरूण धवननंतर आता श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बंधनात

शेअर केला लग्नाचा व्हिडिओ

शर्मिष्ठाने तिच्या लग्नाचे फोटो तर तिच्या फॅन्सासाठी शेअर केले. पण तिच्या लग्नातील तो खास व्हिडिओही तिने तिच्या फॅन्ससाठी शेअर केला आहे. लग्नातील तिचा हा व्हिडिओही इतका सुंदर पद्धतीने एडिट करण्यात आला आहे की, तिच्या या व्हिडिओलाही खूप लाईक्स आणि प्रेम मिळाले आहे. लग्नाच्या बरोबर एक महिन्यानंतर तिने तिचा हा व्हिडिओ सगळ्यांसाठी पोस्ट केला आहे.

वाढले फॉलोअर्स

शर्मिष्ठाला तिच्या फॅन्सचे भरपूर प्रेम या काळात मिळाले आहे. तिने प्रत्येक वेळी त्यांचे आभारही मानले आहे. या लॉकडाऊनच्या काळात तिच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर तिचे फॉलोअर्सही झपाट्याने वाढले आहेत. 1 लाखाहून अधिक फॉलोवर्स तिचे असून तिच्या प्रत्येक पोस्टला तिच्या फॅन्सनी पसंती दिली आहे. 


सध्या शर्मिष्ठा आणि तेजस त्यांचा क्वालिटी टाईम मस्त मालदीव्सच्या किनाऱ्यावर घालवत आहेत. ते अजून काही सुंदर फोटो शेअर करतील अशी अपेक्षा आहे. 

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील ओंकार अर्थात शाल्व किंजवडेकरची वाढतेय क्रेझ