गेल्या काही महिन्यांपासून श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा यांच्या लिंकअप आणि लग्न होणार असल्याच्या बातम्या मीडियांमध्ये येत आहेत. पण हे दोघं मात्र याबाबत अळीमिळी गूपचिळी ठेऊन आहेत. पण म्हणतात ना की, मांजराने कितीही डोळे मिटून दूध प्यायलं तरी जगाला कळतंच. याचंही थोडं तसंच आहे. किती दिवस हे दोघंही आपलं प्रेम जगापासून लपवतील नाही का? अखेर या दोघांच्या खास वेकेशनचे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आपल्या नवीन चित्रपटाच्या स्ट्रीट डान्सरच्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण या टाईट शेड्यूलमधून वेळ काढून ती खास रोहनसाठी एंटाल्या या ठिकाणी पोचली. हो… खास रोहनसाठी. कारण रोहन या ठिकाणी आधीच पोचलेला होता. श्रद्धाने तिकडे घेतलेला एक व्हिडीओ आणि काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर केले आहेत. यातील एका स्टोरीमध्ये तिला या ठिकाणी पोचण्यासाठी कितीवेळा लागला हेही शेअर केलं आहे.
आता आपल्या खास व्यक्तीला भेटण्यासाठी एवढा प्रवास करायला लागला तरी काही हरकत नाही.
रोहन एक प्रसिद्ध सेलीब्रिटी फोटोग्राफर आहे. त्यामुळे याच निमित्ताने रोहन आणि श्रद्धा एका फोटोशूटसाठी एंटाल्याला पोचले. एंटाल्या हे तुर्कस्तानमधील एक सुंदर लोकेशन आहे. श्रद्धाने हे फोटोशूट खूप एन्जॉयही केलं.
श्रद्धा कपूरच्या गाण्यावर थिरकली लक्ष्मी, व्हिडिओ व्हायरल
या छोट्याश्या एक दिवसाच्या वेकेशननंतर श्रद्धा भारतात शुक्रवारी सकाळीच परतली. पण यावेळी रोहन मात्र तिच्यासोबत दिसला नाही. श्रद्धा एकटीच भारतात परत आल्याचं दिसलं.
View this post on Instagram#shraddhakapoor snapped today morning #airportdiaries #viralbhayani @viralbhayani
श्रद्धाचा हा एअरपोर्ट लुक एकदमच कॅज्युअल होता. तिने व्हाईट टॉप आणि ब्लू डेनिमचा पायजमा घातला होता. या लुकला मॅचिंग कॅप आणि गॉगल तिने कॅरी केले होते. श्रद्धा यावेळी फारच खूष दिसत होती.
सायना नेहवाल बायोपिकमधून श्रद्धा कपूर आऊट, परिणिती साकारणार सायना
फरहान अख्तरबरोबर वादग्रस्त अफेअरनंतर अखेर आता श्रद्धाने मूव्ह ऑन केलं आहे.
View this post on Instagram
रोहन आणि श्रद्धा या दोघांच्या नात्यावर दोघांच्या कुटुंबानेही मोहर लावल्याची चर्चा आहे. म्हणूनच या दोघांनी खास दिवाळीही एकत्र साजरी केली होती. त्यांच्या लग्नाबाबतची बातमीही आम्ही दिली होती.
श्रद्धाच्या बॉलीवूड करिअरही सध्या जोरदार सुरू आहे. ती सध्या 'स्ट्रीट डान्सर 3D' या चित्रपटासाठी शूटींग करत आहे. तिच्यासोबत या चित्रपटात वरूण धवन दिसणार आहे. तर यानंतर तिचा प्रभाससोबतचा साहो हा चित्रपटही येणार आहे.
एकूणच श्रद्धाच्या आयुष्यातील बॅडपॅच गेल्याचं चित्र आहे.