अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत असते. श्रुतीचे नेहमी वेगवेगळे फोटो तिच्या चाहत्यांना पाहायला मिळतात. नुकतंच श्रुतीने फोटोशूट केलं आहे आणि त्याचे फोटो तिने शेअर केले आहेत. सध्या हे फोटो खूपच व्हायरल होत असून श्रुतीच्या या फोटोंना खूपच कमेंट्स आणि लाईक्स मिळाले आहेत. मराठी मालिका असो वा हिंदी मालिका असो, चित्रपट असो श्रुतीने नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आता पुन्हा एकदा आपल्या या फोटोसेशनमुळे श्रुती चर्चेत आली आहे. सध्या श्रुतीच्या सौंदर्याने तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
प्रेक्षकांसाठी अभिनयाची ‘अजूनही बरसात आहे’ मुक्ता आणि उमेश एकत्र
पावसातील लक्षवेधी फोटो
श्रुतीने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये साडीतील पावसात भिजलेले दोन फोटो आहेत. जे अत्यंत लक्षवेधी असून श्रुतीचे सौंदर्य या फोटोंमध्ये खुलून आले आहे. ‘कभी बेपनाह बरस पड़ी, कभी गुम सी हैं, ये बारिश भी कुछ कुछ, तुम सी’ है अशी कॅप्शन देत श्रुतीने हे फोटो पोस्ट केले आहेत. श्रुतीचे हे सौंदर्य फोटोग्राफर शैलेंद्र परदेशीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. तर दुसऱ्या पोस्ट केलेल्या फोटोंमध्येही श्रुतीने नेसलेली साडी आणि तिच्या सौंदर्याच्या अदा कमाल आहेत. तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि अदा या तिचा फोटो पुन्हा पुन्हा बघायला लावणाऱ्या आहेत असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. श्रुतीने गेल्या काही वर्षात स्वतःमध्ये अनेक बदल घडवत स्वतःकडे अधिक लक्ष दिले आहे. स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत श्रुतीने आपणही इथे टिकायला आलो आहोत हेच एकप्रकारे सिद्ध केले आहे. आपली अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत श्रुतीने मराठीच नाही तर अगदी दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येही आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. मराठी, तामिळ अशा दोन्ही भाषांमध्ये श्रुती सध्या काम करते आहे. तर तिचे अनेक चाहतेही आहेत. दरम्यान दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती श्रुती प्रकाश या नावाने प्रसिद्ध आहे.
समीरा रेड्डीने पुन्हा शेअर केल्या बॉडी पॉझिटिव्हिटीबाबत खास टिप्स
श्रुती नुकतीच एका हिंदी मालिकेत झळकली
मराठी असो वा हिंदी मालिका श्रुती नेहमी आपल्या अभिनयाची छाप पाडते. नुकत्याच एका हिंदी मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका श्रुतीने साकारून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर अनेक मराठी आणि तामिळ चित्रपटातून श्रुतीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. मराठी मालिकांमधील परी म्हणूनही श्रुतीकडे पाहिलं जातं. श्रुतीच्या चेहऱ्यामधील गोडवा नेहमीच सर्वांना भावतो. काही फोटोंमध्ये श्रुती एखाद्या बाहुलीप्रमाणे नाजूक आणि सुंदर दिसते आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक फोटोवर अनेक कमेंट्स येत असतात. श्रुतीने तीन वर्ष गौरव घाटणेकरसह नात्यात राहिल्यानंतर त्याच्यासह लग्नगाठ बांधली. दोघेही उत्तम कलाकार असून दोघेही आपापल्या कामामध्ये व्यग्र आहेत. तर आता पुन्हा नव्याने श्रुतीचे कोणते फोटो पाहायला मिळणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण श्रुतीचे प्रत्येक फोटो हे अप्रतिमच आहेत अशीही चाहत्यांची प्रतिक्रिया आता येत आहे.
सुशांत सिंह राजपूतवरील बायोपिकला हिरवा कंदील, कोर्टाने फेटाळली याचिका
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक