अभिनेत्री श्वेता शिंदेचा कमबॅक, या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री श्वेता शिंदेचा कमबॅक, या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अवंतिका,  अवघाची हा संसार, वादळवाट या गाजलेल्या मराठी मालिकांमधून एकेकाळी श्वेता शिंदे हे नाव घराघरात पोहचलं होतं. या मालिकांमधील छोट्यापण तितक्याच दमदार भूमिकांनी श्वेताला लोकप्रियता मिळाली. काही मालिकांमधून काम केल्यावर श्वेता निर्मिती क्षेत्राकडे वळली. या क्षेत्रातही तिने चमकदार कामगिरी केली. लोकप्रिय मालिका ' लागीर झालं जी’ आणि सध्या सुरु असलेली ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांची यशस्वी रित्या तिने निर्मिती केली. आता श्वेता पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात पुनरागमन करणार आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना नक्कीच  आनंद झाला आहे. मात्र ती कोणत्या मालिकेत नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. झी युवा वाहिनीवर एका नवीन एका मालिकेत श्वेता तिची अदाकारी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Instagram

श्वेता शिंदेचा अभिनय प्रवास

श्वेता मूळची साताऱ्याची ती महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत आली. मुंबईत महाविदयालयात शिक्षण घेत असतानाच तिच्या दिलखेचक सौंदर्यामुळे तिला सतत मॉडेलिंग च्या ऑफर येऊ लागल्या. सौंदर्य आणि तिचा आत्मविश्वास यामुळे घरचा पाठिंबा नसतानाही तिने या ऑफर्स स्वीकारायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पहिले नाही. कारण या ऑफर्ससोबत तिला अनेक उत्तोमत्तम मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारायला मिळाल्या.  ज्यामुळे तिला महाराष्ट्राच्या घराघरात प्रसिद्धी मिळाली. सध्या ती निर्मिती क्षेत्रात वळली असल्यामुळे प्रचंड बिझी झाली आहे. त्यामुळे तिला अभिनयासाठी हवा असेलला वेळ देता येत नाही. पण आता ती लवकरच जय मल्हार फेम देवदत्त नागेसोबत झी युवा वरील एका नवीन मालिकेत दिसणार आहेत. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडिया आणि व्हाट्सएपवर भरपूर वायरल होत आहे. ज्यात देवदत्त नागे जय मल्हार लुकच्या अगदी विरुद्ध अश्या वेषात दिसत आहे आणि त्याला पोलीस पकडत आहेत तर दुसरीकडे श्वेता त्यांच्या गळ्यातील मफलर पकडून एक स्मितहास्य देत आहेत. ज्यामुळे झी युवावर नवीन येणाऱ्या या मालिकेत या दोघांची नक्की काय केमिस्ट्री असणार आहे आणि कोणती भूमिका त्या साकारणार आहे याची प्रेक्षकांना आता उत्सुकता लागून लागली आहे.

श्वेता काय म्हणाली याबाबत

श्वेताला तिच्या भूमिकेबद्दल विचारले असता, तिने सांगितले की "ही भूमिका, एका कॉलेजच्या डीनची आहे, एवढंच मी आत्ता सांगू शकतो. एक वेगळ्या प्रकारची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनयासोबत माझं नातं खूप जुनं आहे. 'अवंतिका', 'वादळवाट', 'अवघाची संसार'सारख्या मालिकांमध्ये मी काम केलेलं आहे. 'लागिरं झालं जी' मिसेस मुख्यमंत्री या मालिकेची निर्मिती सुद्धा मी केलेली आहे. ज्यामुळे मी 'झी'मध्येच लहानाची मोठी झाले असं म्हणता येईल.  आज बऱ्याच वर्षांनंतर मी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करणार आहे. याची मनात थोडीशी धाकधूक आहेच, पण पुन्हा त्याच प्लॅटफॉर्मवरून पुनरागमन करत असल्याने आनंद सुद्धा खूप झालेला आहे. या भूमिकेसाठी माझी तयारी सुरू झालेली आहे. मला वजन कमी करावं लागणार आहे. २ दिवसांपूर्वीच मी डाएट सुद्धा सुरू केलंय. खूप व्यायाम सुद्धा करावा लागणार आहे. व्हॅनिटी व्हॅनवर पुन्हा एकदा नाव बघताना खूपच छान वाटलं. मालिकेचा विषय उत्तम असल्याने काम करायला सुद्धा खूप मजा येईल. प्रेक्षकांना सुद्धा ही मालिका आणि माझी भूमिका खूप आवडेल याची मला खात्री आहे."

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

वर्षभरात एकही चित्रपट न करता शाहरुखने केली 100 कोटीची कमाई

बापलेकीच्या दृढ नात्याची कहाणी, 'वेगळी वाट' सिनेमाची पहिली झलक

गिरीश कुलकर्णी-सयाजी शिंदे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार एकत्र