अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात, केला खुलासा

अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात, केला खुलासा

अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चेत असते. सध्या वरूण वडोलाबरोबर श्वेता तिवारी ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेमध्ये काम करत आहे. बऱ्याच वर्षांनी श्वेता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसत आहे. श्वेताचा फॅन फॉलोईंग अफलातून आहे. या मालिकेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण काही दिवसांपूर्वीच श्वेता तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली होती. श्वेताने अभिनेता अभिनव कोहलीबरोबर दुसरं लग्न केलं होतं आणि आता ती आपल्या दुसऱ्या लग्नातूनही मोकळी झाली असून अभिनवपासून वेगळी झाली आहे.  पण यानंतरही श्वेता पुन्हा चर्चेत आली आहे ती म्हणजे तिच्या नव्या प्रेमामुळे. श्वेता पुन्हा प्रेमात पडली असल्याच्या चर्चा असून खुद्द श्वेतानेच एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. श्वेताने नेहमीच आपलं खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य खुलेपणाने मांडलं आहे. त्यामुळे तिने आता या गोष्टीचादेखील खुलासा केला आहे. 

पलक तिवारी करणार टीव्हीवर पदार्पण

पुन्हा प्रेमात असल्याचे श्वेताने सांगितले

View this post on Instagram

Oye Guneete! #MDKD #Bts

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

श्वेताने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपण प्रेमात असल्याचं कबूल केलं आहे. तिने याबाबत खुलासा करत स्पष्ट केलं आहे. ‘मी माझ्या दोन्ही मुलांवर अतिशय प्रेम करते आणि मी त्यांच्या प्रेमात आहे. त्यांच्यावर प्रेम करण्याशिवाय मला अजिबात वेळ नाही. मी माझ्या दोन्ही मुलांसह व्यस्त आहे आणि त्याशिवाय मला कोणाकडेही बघायला वेळ नाही.’ लग्न तुटल्यानंतर श्वेता तिवारीला अनेक नकारात्मक कमेंट्सनाही सामोरं जावं लागलं होतं. याबद्दलही तिने आपली मतं मांडली. श्वेताने दोन लग्न केली आणि दोन्ही लग्नात तिला यश मिळालं नाही. ‘आपल्या आजूबाजूला अनेक अयशस्वी लोकं असतात. असे अयशस्वी लोकं हे काहीच करू शकत नाहीत. त्यांना फक्त लोकांना अपमानित करायचं असतं. त्यांना तेच जमतं. अशा व्यक्तींकडे मी लक्ष देत नाही’ असं श्वेताने यावेळी म्हटलं. 

अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा करणार लग्न, केला व्हिडिओ शेअर

श्वेताचं खासगी आयुष्य नेहमीच वादग्रस्त

श्वेता तिवारीचं खासगी आयुष्य हे नेहमीच वादग्रस्त राहीलं आहे. 1998 मध्ये तिने अभिनेता राजा चौधरीबरोबर लग्न केलं होती. या दोघांनाही पलक नावाची मुलगी आहे. त्यानंतर राजासह घटस्फोट घेतल्यानंतर श्वेताने अभिनेता अभिनव कोहलीसह दुसरं लग्न केलं. या दोघांना रेयांश नावाचा मुलगा आहे. पण या दोन्ही लग्नामध्ये श्वेताचं दोघांशीही पटू शकलेलं नाही. दुसऱ्या लग्नात तर मुलगी पलक हिने अभिनव कोहली यावर विनयभंगाचा आरोप केला आणि त्यामुळे श्वेता आणि अभिनवचं लग्न मोडलं. काही दिवसांपूर्वीच पोलीस स्टेशनपर्यंत हे प्रकरण पोहचलं होतं आणि त्यानंतर श्वेताने अभिनवपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एकंदरीतच तिच्या दोन्ही लग्नामध्ये तिला कोणत्याही प्रकारचं सुख मिळू शकलेलं नाही असं तिने सांगितलं. पण आता तिला केवळ आपल्या मुलांवरच प्रेम करायचं आहे आणि दोन्ही मुलांना श्वेता एकटी सांभाळत आहे. ती सोशल मीडियावरही नेहमी अॅक्टिव्ह असते. आपल्या दोन्ही मुलांबरोबर ती फोटोही शेअर करत असते. इतकंच नाही तर श्वेताची मुलगी पलकदेखील नेहमीच तिच्या फोटोशूट्मुळे चर्चेत असते. लवकरच पलकही छोट्या अथवा मोठ्या पडद्यावर आगमन करणार असल्याच्या चर्चांना नेहमीच ऊत येतो. पण अजूनही पलक अथवा श्वेताने याबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मात्र पलक नेहमी आपल्या सोशल मीडियावर फोटोशूट केलेले फोटो पोस्ट करत असते.

श्वेता तिवारीच्या दुसऱ्या लग्नातही अडचणी, पतिविरोधात पहिल्यांदा बोलली श्वेता

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.