ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणतेय...क्या पता कल हो ना हो!!!

अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणतेय…क्या पता कल हो ना हो!!!

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) आपल्या अभिनयाने अनेकांचे मन जिंकून घेतले आहे. नकारात्मक भूमिकेने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेल्या तेजस्विनीने मालिका, नाटक, चित्रपट अशा अनेक शाखांमध्ये काम केलं आहे आणि इतकंच नाही तर अभिज्ञा भावेसह (Abhidnya Bhave) स्वतःचा असा तेजाज्ञा ब्रँड निर्माण करून आपली अजून एक फॅशन जगतातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेजस्विनी नावाप्रमाणेच तेजस्वी आहे आणि आपली मते परखडपणे नेहमीच सोशल मीडियावर मांडत असते. अत्यंत बिनधास्त आणि तितक्यात सखोलपणे ती आपलं मत कोणत्याही विषयावर मांडायला घाबरत नाही. आता आपल्या स्वतःच्या हसण्याबद्दलच तेजस्विनीची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ‘मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही’ असं तेजस्विनीने म्हटलं आहे. यावर तिला अनेक लाईक्स आणि कमेंट्सही मिळाल्या आहेत. 

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं ‘लॉकडाऊन लग्न’, सोशल मीडियावर चर्चा

‘मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही’

तेजस्विनी सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले विविध फोटो पोस्ट करून ती आपल्या चाहत्यांना अदांनी घायाळ करते हे नक्कीच. आपल्या अभिनयासह आपल्या फॅशन सेन्सनेही अनेक चाहते तेजस्विनीने निर्माण केले आहेत. विशेषतः तेजस्विनीच्या साड्यांचं कलेक्शन हे अप्रतिम असतं. तर सध्या तेजस्विनीने केलेली अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. ‘माझ्याकडे काय ती म्हणतात ती “perfect smile” वगैरे नाही. आणि तसे दात ही नाहीत…मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजून मापून करायचं ?? त्यातून हसणं…छे !!! आहे अशी आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या…दात दाखवून असो, वा खळखळून असो….मला ‘ हसायला ‘आवडतं हसल्याने आयुष्य वाढतं म्हणतात…हल्ली हसायला फार कमी मिळतंय, तेव्हा हसायची किंवा हसवण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका. ते एका चित्रपटात म्हटलंय ना, क्या पता कल हो ना हो…..!!!’ सध्या कोरोनामुळे अनेकांना खरंच खूप कमी हसायला मिळत आहे आणि यातून आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही हेच तेजस्विनीला सुचवायचं आहे असं म्हणावं लागेल. प्रत्येकाने स्वतःला जपणं अत्यंत गरजेचे आहे. सर्वांनी सकारात्मक राहणं गरजेचे आहे आणि त्यासाठीच सध्या सगळे प्रयत्न करत आहेत. 

अभिनेत्री पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्रींचा कोव्हिड-19 पीडित मुलांना दत्तक घेण्यास पुढाकार

ADVERTISEMENT

अनेक सेलिब्रिटींनी फोटोवर केली कमेंट

तेजस्विनीच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींनी कमेंट करत आणि इमोजी करत तिला पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री ईशा केसकरने ‘सुंदर हसतेस’ अशी कमेंट केली आहे. अभिज्ञाने ‘सेम पिंच’ म्हणत तिला दुजोरा दिला आहे. अमृता देशमुखने तेजस्विनीला कमेंटमध्ये म्हटलं आहे, ‘जर हे स्माईल परफेक्ट नसेल तर मग नक्की कोणतं हसू परफेक्ट असतं?’ तर सुयश टिळक, स्पृहा जोशी, गायत्री दातार यांनी प्रेमाचे इमोजी देत तेजस्विनीच्या फोटोवर कमेंट केली आहे. तेजस्विनीच्या या निखळ हसण्यावर तिचे चाहते फिदा झाले नसते तर नवलच! चाहत्यांना तिचा हा फोटो खूपच आवडला असून अनेक चाहते त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर हसणं किती गरजेचे आहे हेदेखील सांगत आहेत. 

इस्लाममधील स्त्रियांच्या अस्तित्वावरुन प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्याला गौहरने दिले सडेतोड उत्तर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

19 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT