आणखी एका अभिनेत्रीचा सोशल मीडियाला रामराम, दिले हे कारण

आणखी एका अभिनेत्रीचा सोशल मीडियाला रामराम, दिले हे कारण

सोशल मीडिया अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेय झटपट प्रसिद्धी मिळवण्याचे हे असे माध्यम आहे की, याचा मोह कोणालाही आवरता येत नाही. सेलिब्रिटींसाठी त्यांच्या फॅन्सना बांधून ठेवण्यासाठी हे महत्वाचे असे माध्यम आहे. पण या सोशल मीडियाचा इतका सगळा फायदा असतानाही अनेक सेलिब्रिटी या प्लॅटफॉर्मला रामराम करुन चालले आहेत. आमिर खानने काहीच दिवसांपूर्वी या माध्यमाला कायमचा रामराम केला आणि आता आणखी एका अभिनेत्रीने आमिरचा दाखला देत या माध्यमाला कायमचा बायबाय केला आहे. ही अभिनेत्री अन्य कोणी नाही तर  वरिना हुसैन आहे. तिने एक पोस्ट शेअर करत ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे. 

या कारणासाठी वरिनाला नको झालाय सोशल मीडिया

सध्या सगळ्या सेलिब्रिटींची अप टू डेट माहिती देणारे इन्स्टाग्राम हे आवडीचे सोशल प्लॅटफॉर्म आहे असे असले तरी देखील खूप जणांनी या पासून दूर राहणेच पसंत केले आहे. काही जणांनी या प्लॅटफॉर्मवरुन आधीच रामराम ठोकला आहे. आता यामध्ये वरिना हुसैनची भर पडली आहे. पण वरिना सोशल मीडिया का सोडतेय? असा प्रश्न सगळ्यांना पडणे स्वाभाविक आहे. तिने एक पोस्ट शेअर करत एक मेसेज दिला आहे. तो असा की, सगळ्या गोष्टींची माहिती देणे हे गरजेचे नसते. पण इतके दिवस मी माझ्या फॅन्ससाठी आणि मित्रांसाठी केले पण आता या पुढे ते न करणेच जास्त योग्य राहील. मी सोशल मीडियापासून दूर राहात असले तरी देखील माझी टीम यापुढे तुम्हाला माझ्या प्रोजेक्टविषयी अधिक माहिती देत राहणार आहेत. त्यामुळे मी तुमच्याशी कायम जोडलेली असेन. पण अशी पोस्ट करुन ती आता तिच्या खासगी कोणत्याही पोस्ट या माध्यमातून शेअर करणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

सोनू सूद पुन्हा एकदा गरिबांच्या मदतीला, ट्विट व्हायरल

चाहत्यांना बसला धक्का

वरिनाने ही पोस्ट शेअर करत ही माझी शेवटची सोशल मीडिया पोस्ट आहे. जी मी शेअर करत आहे. ही ओळ वाचून तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यांनी कमेंट करुन तिला नको जाऊस असाच सल्ला दिला आहे. खूप जणांना तिने असे सोडून जाणे अजिबात रुचलेले नाही. तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी खास कमेंट्स करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  तिच्या चाहत्यांनी तू असा निर्णय का घेतेस असा प्रश्न वारंवार केला आहे. तर काही सेलिब्रिटींनी तिच्या या निर्णयाचा मान ठेवत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  

अवघ्या काहीच चित्रपटात केले काम

वरिनाला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘लवयात्री’ या चित्रपटातून. सलमान खान निर्मित या चित्रपटात ती सलमान खानचा जीजू आयुष शर्मासोबत दिसली होती. हा या दोघांचा पहिला बॉलीवूड डेब्यू होता. या चित्रपटातील गाणी आणि रासगरबा इतका प्रसिद्ध झाला की, नवा चेहरा असलेली वरिना हुसन पहिल्याच दिवसापासून सोशल मीडियावर हिट झाली. तिचे इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. पण आता तिच्या या घोषणेनंतर यामध्ये किती वाढ होईल हे पाहावे लागेल. तुर्तास तिने तिच्या खासगी कारणासाठी हा निर्णय घेतला हे नक्की!

रणबीर कपूर लवकरच चाहत्यांना देणार सरप्राईझ, व्हिडिओ केला शेअर

या कलाकारांनीही केला रामराम

वरिना हुसैनच नाही तर या आधी अनेक बड्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाला राम राम केला आहे. यामध्ये सना खान,आमिर खान आणि अन्य काही बड्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाला रामराम केला आहे. 


दरम्यान वरिना हुसैनही स्वत: तिचे अकाऊंट पाहणार नसली तरी देखील तिचे अपडेट या अकाऊंटमधून मिळत राहणार आहे.

प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण वेगळ्या ठिकाणी