'83' चित्रपटात आदिनाथ कोठारे साकारणार 'दिलीप वेंगसरकर' यांची भूमिका

'83' चित्रपटात आदिनाथ कोठारे साकारणार 'दिलीप वेंगसरकर' यांची भूमिका

भारतीय क्रिकेट टीमने 25 जून 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या विषयावर आधारित ‘83’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्यावेळच्या क्रिकेट टीमचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग साकारत आहे. यासोबत भारतीय माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची भूमिका मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे साकारत आहे. आदिनाथ कोठारेचे अनेक चाहते आहेत. ऊर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे हे दोघंही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. आदिनाथने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आदिनाथने वडिलांच्या माझा छकुला या चित्रपटातून लहानपणीच चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. शिवाय आदिनाथने त्याचे वडील महेश कोठारे यांच्याप्रमाणे अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रातही चांगलं नाव कमावलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आदिनाथ चॉकलेट हिरो म्हणून ओळख मिळवली आहे. आता आदिनाथ बॉलीवूडमध्ये त्याचे नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाला आहे. 83 चित्रपटातून  तो त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटात पदार्पण करीत आहे. आदिनाथने त्याच्या इन्स्टा आणि ट्विटर अकाऊंटवरून तो ही भूमिका करण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचं शेअर केलं आहे.

83 चित्रपटाची टीम शूटिंगसाठी सज्ज


83 चित्रपट कबीर खान दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटातील 1983 सालचे दिग्गज क्रिकेटपटू साकारण्यासाठी अनेक हिंदी आणि मराठी अभिनेत्यांची टीम त्यांनी तयार केली आहे. रणवीर सिंग कपिल देव, आदिनाथ दिलीप वेंगसरकर तर कृष्णामाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. सैयद किरमानी यांची भूमिका साहिल खट्टर तर पंकज त्रिपाठी ‘मानसिग’ यांची भूमिका साकारणार आहे.सुनिल गावस्कर यांचा रोल ताहिर भसीन साकारणार आहे. विशेष म्हणजे संदीप पाटील यांची भूमिका यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील साकारणार आहे. शिवाय कपिल देव यांची  मुलगी आमिया देव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शन करणार आहे. ती पहिल्यांच या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरूवात करत आहे. या टीममध्ये चिराग पाटील आणि आदिनाथ कोठारे या दोन मराठी कलाकारांची वर्णी लागल्याने त्यांचे चाहते फारच खूश झाले आहेत. थोडक्यात या चित्रपटातून अनेकजण आपलं नशिब आजमावणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. 83 चित्रपट 10 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार असून लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.

सोशल मीडियावर ‘छा गये छोटे नबाव’, पाहा फोटो


Good News: बॉलीवूड अभिनेत्री आहे गरोदर, फोटो केला शेअर


वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम