मिस वर्ल्ड अदिती आर्याला मिळाली सुवर्णसंधी

मिस वर्ल्ड अदिती आर्याला मिळाली सुवर्णसंधी

मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धांमधून चित्रपटसृष्टीत येणं काही नवीन नाही. मनोरंजन विश्वात अशा प्रकारे अनेक चेहरे आले आणि काहींनी तर भरपूर प्रसिद्धीही मिळवली. मॉडेलिंगमधून पदार्पण करणारी अदिती आर्यासुद्धा असंच एक नाव आहे. अदिती ही 2015 फेमिना मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड म्हणून ओळखली जाते. बॉलीवूडमधल्या चर्चित आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘83’ या मल्टीस्टारर चित्रपटाद्वारे ती बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटानंतर आता बॉलीवूडमध्ये

अदितीने या आधीच दाक्षिणात्य सिनेमातील तेलगू भाषेतील ‘इस्म’मधून डेब्यू केलं होतं. दक्षिणेत तिच्या मोहक उपस्थिती आणि तिच्या अप्रतिम अभिनयासाठी नाव कमावलं आहे. अदिती आर्या हा दक्षिण चित्रपटातील प्रमुख चेहरा आहे. त्यांनी ‘सेव्हन’, ‘आयएसएम’ आणि ‘कुरुक्षेत्र’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तिने दक्षिण चित्रपटातच नाहीतर हिंदी वेबसिरिज ‘तंत्र’ आणि ‘स्पॉटलाईट’ मध्ये सुद्धा काम केलं आहे. आता अदिती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून बहुप्रतिक्षित ‘83’ चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

'83' बद्दल उत्सुकता

Instagram

‘83’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबाबत अदिती खूपच उत्साहित आहे. या चित्रपटाबाबत अदिती म्हणाली की," मला या चित्रपटाचा पहिल्यापासून भाग व्हायची इच्छा होती, कारण त्यात भारताला अभिमान वाटणारा ऐतिहासिक क्षण आहे; मी स्वतःला खूप नशीबवान समजते की, माझ्या बॉलीवूड करियरच्या सुरवातीलाच मला एवढ्या मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यातही कबीर खानसारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता.

'83' ची जबरदस्त स्टारकास्ट

या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, साकीब सलीम, बोमन इराणी, आदिनाथ कोठारे आणि अनेक कलाकार दिसणार आहेत. दिग्दर्शक कबीर खान यांनी चित्रपटाच्या माध्यमातून क्रिडा विश्वातील इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच लग्नानंतर दीपिका आणि रणवीरची जोडी ऑनस्क्रीन नवऱ्याबायकोच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग भारतीय टीमच्या कप्तान कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे.

सूर्यवंशीने प्रीपोन केलं रिलीज

एवढंच नाहीतर या चित्रपटासाठी सूर्यवंशी या अक्षयकुमारच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेटही बदलण्यात आली आहे. 83 हा 10 एप्रिलला रिलीज होत आहे तर सूर्यवंशीचं रिलीज प्रीपोन केल्यामुळे तो आता 25 मार्चला रिलीज होईल. सूर्यवंशीच्या प्रीपोन रिलीजमुळे दोन्ही चित्रपटांना फायदा होईल. या सूर्यवंशी चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती ही रोहित शेट्टीची आहे. तर या चित्रपटात बऱ्याच वर्षानंतर अक्षय कुमार आणि कतरिना कैफची जोडी दिसणार आहे.

अदिती आर्याच्या रूपाने बॉलीवूडला एक फ्रेश चेहरा मिळणार आहे, याबाबत नक्कीच शंका नाही.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.