ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
प्रसिद्ध गायक – निवेदकही लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

प्रसिद्ध गायक – निवेदकही लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

सध्या लग्नाचा हंगामच चालू झाल्यासारखे वाटत आहे. तर सेलिब्रिटी या लॉकडाऊनमध्ये एकापाठोपाठ एक नात्याचा खुलासा करत आहेत. नेहा कक्करने आपण रोहनप्रीत सिंगशी या महिन्याच्या शेवटी लग्न करत असल्याची कबुली दिल्यानंतर नेहूचा जवळचा मित्र आदित्य नारायणनेही आपण या वर्षाच्या शेवटी लग्न करणार असल्याचे सांगत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. इतकंच नाही सेलिब्रिटी असूनही गेले 10 वर्ष आदित्य नारायण ज्या मुलीला डेट करत आहे तिच्याशी लग्न करणार असून कोणालाही याबाबत माहिती नव्हती. गेल्यावर्षी नेहा आणि आदित्यच्या लग्नाच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र हे केवळ टीआरपीसाठी होते. आदित्य लवकरच अभिनेत्री श्वेता अगरवालसह लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे त्याने स्वतः सांगितले आहे.

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या लग्नसोहळ्यातील आनंंदाचे क्षण, फोटो व्हायरल

आदित्यने केली घोषणा

Instagram

ADVERTISEMENT

आदित्य नारायण  हा उदित नारायण यांचा मुलगा असला तरीही अभिनेता, गायक आणि निवेदक अशी स्वतःची ओळख त्याने काही वर्षात निर्माण केली आहे. आदित्य अतिशय खोडकर असून अनेकदा त्याचे लिंक अप्सदेखील ऐकायला मिळाले आहे. मात्र आदित्य गेले दहा वर्ष अभिनेत्री श्वेता अगरवालला डेट करत असून तिच्याशीच लग्न करणार असल्याचे त्याने घोषित केले आहे. ‘शापित’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या  वेळी श्वेता आणि आदित्यची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर  प्रेमात झाल्याचे आदित्यने एका मुलाखतीत स्पष्ट केले. अगदीच लहान असल्याने त्यावेळी केवळ मैत्री हवी होती. अनेकांप्रमाणे आमच्याही नात्यात अनेक  चढउतार आले. पण  आमचे नाते कायम अतूट राहिले. येत्या नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये  श्वेता आणि आदित्य लग्न करण्याचा विचार करत आहेत. तर श्वेता ही आदित्यच्या आई-वडिलांनाही पसंत  असून त्यांनी त्यांच्या नात्याला कधीच हिरवा कंदील दिला असल्याचे आदित्यने सांगितले. 

अभिनेत्री माही विजला दुसऱ्यांदा व्हायचं आहे ‘आई’

काही वर्षांपूर्वी ब्रेकअपची चर्चा

Instagram

ADVERTISEMENT

काही वर्षांपूर्वी श्वेता आणि आदित्यच्या  नात्याविषयी बोलले गेले होते. त्यावेळी त्यांचे ब्रेकअप झाले अशी चर्चाही होती. त्यानंतर दोघांनी काही काळ एकत्र बाहेर जाणेही थांबवले होते.  मात्र त्यांच्या नात्यातील हा चढउतार संपला असून आता लग्नाची योग्य वेळ आली आहे असं आदित्यला वाटत आहे. त्यामुळे आता लवकरच ही जोडी बोहल्यावर चढणार असून अनलॉकमध्ये  अजून एका सेलिब्रिटीचे लग्न  पाहायला मिळणार आहे. आदित्य आणि श्वेताच्या नात्याबद्दल याआधी बरंच बोलण्यात आलं होतं. पण आदित्यने हे नातं ना कधी लपवलं ना कधी  स्वीकारलं. त्याने याविषयी काहीही न बोलणंच नेहमी पसंत केलं होतं. पण आता  आदित्यने अगदी हक्काने आपण श्वेतावर प्रेम करत असून लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. तर आदित्यची जवळची मैत्रीण नेहू अर्थात  नेहा कक्करने ‘नेहूप्रीत’ असा हॅशटॅग देत  आपण लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या  दोघांचेही चाहते आनंदी असून सुखद धक्क्यातून त्यांना शुभेच्छा देत  आहेत. दरम्यान नेहा याच महिन्याच्या शेवटी विवाहबद्ध होणार असून आदित्य आणि  श्वेताच्या लग्नाची तारीख कळू शकलेली नाही. पण याचवर्षी आपण लग्न  करू हे आदित्यने स्पष्ट केले आहे. 

आमिर खानची मुलगी चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT