यश आणि अपयश या प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू आहेत. बॉलीवूडमध्ये तर यशापयाशाचा सिलसिला हा सुरूच असतो. हे सत्य खूप लवकर स्वीकारल्याचं दिसतंय आदित्य रॉय कपूर या अभिनेत्याने. ‘कलंक’ च्या अपयशानंतर बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर अजिबात निराश न होता. उलट तो पुढच्या चित्रपटांच्या भूमिकांमध्ये व्यस्तही झाल्याचं कळतंय.
आदित्य हा आत्तापर्यंत त्याच्या चित्रपटात चॉकलेट बॉय किंवा गंभीर अशा भूमिका केल्या आहेत. पण आता तो लवकरच दिसणार आहे अॅक्शन अवतारात. एवढंच नाहीतर या भूमिकेसाठी तो तब्बल 10 किलो वजनही वाढवणार आहे. कारण या चित्रपटातील अॅक्शन सीन्ससाठी तो खास मस्क्युलर बॉडीत दिसेल. तसंच या चित्रपटात तो फक्त अॅक्शनच नाहीतर अजून एका लुकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने वजन वाढवायला सुरूवातही केली आहे.
एकीकडे आदित्यने कलंकच्या अपयशानंतर नव्या भूमिकांवर लक्ष केंद्रित केलं आहे तर मागील दिवसांमध्ये वरूण धवन मात्र चित्रपटाच्या अपयशाने निराश झाल्याची बातमी आली होती. तसंच त्याने चित्रपटाचं अपयश स्वीकारल्याची बातमीही आली होती.
या अॅक्शन चित्रपटासोबतच आदित्य मोहित सूरीच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या मलंग मध्येही काम करणार आहे. हा एक रोमँटीक हॉरर चित्रपट असेल. या चित्रपटाबाबतही खूपच उत्सुक असल्याच आदित्यने नुकत्याच एका चित्रपटात सांगितलं होतं. हा एक डार्क थ्रिलर असून यात प्रेमकहाणीही आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात आदित्यसोबत दिसणार आहे दिशा पटनी, अनिल कपूर आणि कुणाल खेमूही दिसणार आहेत. आदित्य आणि दिशाचा मॉरिशसमध्ये शूट करतानाचा फोटोही व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
‘मलंग’ सोबतच आदित्य लवकरच महेश भट यांच्या 'सडक 2' मध्ये आलिया भटसोबत दिसणार आहे.
View this post on Instagram
काहीही असो आदित्यचा कलंक हा चित्रपट ‘ओके जानू’नंतर तब्बल दोन वर्षांनी आला होता. पण आदित्यने या चित्रपटाच्या अपयशाकडे दुर्लक्ष करत नवीन वाटचालीला सुरूवात केली आहे आणि बातमीमुळे त्याच्या गर्ल फॅन्सनाही नक्कीच आनंद होईल.