अनुराग कश्यपनंतर अभिनेत्रीने इरफान पठाणचे घेतले नाव, जाणून घ्या कारण

अनुराग कश्यपनंतर अभिनेत्रीने  इरफान पठाणचे घेतले नाव, जाणून घ्या कारण

दिग्दर्शनक अनुराग कश्यपने माझा लैगिंक छळ केल्याचा आरोप अभिनेत्री पायल घोष हिने केला होता. त्यानंतर थंडावलेल्या #MeToo चळवळीला पुन्हा एकदा नवा विषय मिळाला. अनुराग कश्यपचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनीही त्याला चौकशीसाठी बोलावले. पण आता यामध्ये आणखी एका व्यक्तीचे नाव पुढे आले आहे. अभिनेत्रीने क्रिकेटर इरफान पठाणचे नाव या सगळ्या प्रकरणामध्ये काही कारणास्तव घेतले आहे. इरफानचा या प्रकरणाशी काय संबंध असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. जाणून घ्या अभिनेत्रीने का घेतले इरफान पठाणचे नाव. 

नेहा कक्करचे लग्न पुन्हा एकदा पब्लिसिटी स्टंट, अनेकांना पडला प्रश्न

आता तरी बोल…. इरफान

अभिनेत्रीने सगळ्या प्रकरणाबद्दल ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते. आता ही नवी गोष्टही तिने ट्विटरच्या माध्यमातून सांगितली आहे. तिने ट्विट करत इरफान पठाणचा उल्लेख केला आहे. पायल घोष आणि इरफान पठाण यांचे चांगले संबंध असून तिने तिच्यावर झालेली आपबीती इरफानला सांगितलेली होती. इरफानने या संदर्भात पुढे येऊन बोलावे असे तिला वाटत आहे. तिने ट्विट करत इरफानचा फोटोही शेअर केला आहे. पण तिने लिहिले की, इरफानला फोटाेमध्येन टॅग करण्याचा कोणताही वाईट अर्थ काढला जाऊ नये. इरफान हा माझा चांगला मित्र आहे. त्याला मी या काही गोष्टी सांगितल्या नसल्या तरी तो मला ओळखतो. त्यामुळे यामध्ये इरफानच्या पाठिंब्याची तिला अपेक्षा आहे. पण अद्याप इरफान यामध्ये काहीही बोलला नाही. त्यामुळे अनेक जण इरफान पठाण काहीतरी बोलेल याच्या प्रतिक्षेत आहेत. 

आधीही अनेकांच्या नावाचा उल्लेख

इरफान पठाण आधीही पायलने अनेक सेलिब्रिटींची नावे घेतली आहे. तिने आतापर्यंत अनुराग कश्यपविरोधात अनेक व्हिडिओ आणि ट्विट केलेले आहेत. ती सातत्याने तिच्या अकाऊंटवरुन या गोष्टी शेअर करत असते. पण इरफानला काही गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी तिने काही ट्विट केलेले आहेत. तिने आणखी एक ट्विट केले असून त्यामध्ये ती 2014 साली झालेल्या एका टेलिफोनिक संभाषणाबद्दल सांगत आहे. अनुराग कश्यपचा तिला फोन आला होता. त्याने तिला तिच्या घरी बोलावले होते. पण तिथे न जाता ती एका वेगळ्या पार्टीला जाणार असल्याचे संभाषण इरफान समोर असताना घडले होते. त्यामुळे त्याने पायलची बाजू स्पष्ट करावी असे तिला वाटत आहे. 

नवरंगामध्ये न्हाऊन निघाल्या आहेत मराठी तारका

ट्विटरवर असते सतत अॅक्टिव्ह

सोशल मीडिया पुरेपूर वापर करत पायल घोषने आपली मतं मांडली आहेत. तिला पाठिंबा देणाऱ्याचे तिने आभार मानले आहेत. तर तिच्याविरोधात वाईट आणि घाणेरडी वक्तव्य करणाऱ्याला तिने चांगलेच फटकारले आहे. पायलने या प्रकरणाला सुरुवात केल्यापासून सातत्याने ट्विट केले आहेत. अनुराग कश्यपविरोधात असलेला सगळा राग तिने काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तिच्या ट्विटरवर ती सतत टिव टिव करताना दिसत आहेत. 


दरम्यान, हे सगळे प्रकरण 2014 साली झाले होते. पण त्यावेळी तिने कोणताही आवाज उठवला नाही. पण आता ती सतत या संदर्भात चर्चा करताना दिसत आहे. त्यामुळे अर्थातच तिच्यावर टिका होत आहेत.

अमृता खानविलकरचे हे मेकअप लुक नक्की करा ट्राय