दयाबेननंतर सोनू सोडणार तारक मेहता का उलटा चश्मा मालिका

दयाबेननंतर सोनू सोडणार तारक मेहता का उलटा चश्मा मालिका

तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका पाहणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण या मालिकेतील सोनू आपल्याला या पुढे मालिकेत दिसणार नाही. कारण सोनू अर्थात अभिनेत्री निधि भानुशालीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतून एक्झिट घेणारी ही पहिला अभिनेत्री नाही तर याआधीही मालिकेतील अनेक चेहरे बदलण्यात आले होते. आता मालिकेचे निर्माते असित मोदी नवी सोनू आणतात का यासाठी थोडी वाट तर पाहावीच लागणार आहे.


म्हणून निधि सोडतेय मालिका


तारक मेहता ही मालिका गेली कित्येक वर्षे सुरु आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राशी अनेकांची जवळीक झाली आहे. सर्वाधिक टीआरपी असलेली ही मालिका आहे. त्यामुळेच मालिकेत एखादा जरी बदल झाला तर तो पटकन लक्षात येतो. सोनू हे पात्र या आधी झील मेहता साकारत होती. तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर निधि भानुशाली नवी सोनू म्हणून सगळ्यांसमोर आली आणि प्रेक्षकांनीही तिला पसंती दिली.  पण आता मालिकेतील सोनू अर्धात निधि भानुशाली ही मालिका सोडत आहे या मागचे खरे कारण आहे तिचा 'अभ्यास'. निधि मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत असून शुटींगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे तिला अभ्यासासाठी फारसा वेळ मिळत नाही.अनेकदा तिला सेटवरच अभ्यास करताना पाहिले आहे. आता पूर्णवेळ अभ्यासात लक्ष देण्याची गरज असल्यामुळे तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे तिच्या या निर्णयाला निर्मात्यांनीही पाठिंबा दिला आहे, असे कळत आहे.


nidhi bhanushali


रणबीर आणि दीपिका पुन्हा येणार एकत्र


दयाबेन पुन्हा येण्याची शक्यता नाही


तारक मेहताच्या मालिकेचा युएसबी दयाबेन अर्थात दिशा वकानी आहे.  २० नोव्हेंबर २०१७ रोजी तिला कन्यारत्न झाले. तिच्या प्रेग्नंसीच्या काळापासूनच तिने मालिकेला रामराम केला आहे. मॅटर्निटी लीव्ह संपल्यानंतर दिशा परत येईल,अशी आशा तिच्या फॅन्सना होती. पण ती पुन्हा या मालिकेत दिसली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा मालिकेत परतण्याची शक्यता नाही. कारण आता मॅटर्निटी लीव्ह संपून बराच कालावधी उलटून गेला आहे. दिशाने मालिकेच्या शुटींगसाठी परतावे यासाठी तिला अल्टीमेटमही देण्यात आला आहे. ती मालिकेत परतणार नसेल तर तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याची तयारी मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दाखवली आहे. त्यामुळे 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये नवी दया येणार का? आणि आली तर ती प्रेक्षकांना आवडेल का ? हा मोठा प्रश्न आहे.  


disha vakani


सोशल मीडियावर आलियाची look a like होत आहे व्हायरल


मालिकेत आधीही केलेत बदल


'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेत आतापर्यंत अनेकवेळा बदल करण्यात आले आहे. या आधी झालेला मोठा बदल होता. टप्पू अर्थात भाव्य गांधीचा. भाव्य गांधीने ही मालिका सोडल्यानंतर नवा टप्पू आला. शिवाय रोशन सिंह सोदी, रोशन सिंह सोदीची बायको, डॉक्टर हंसराज हाथी असे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता दयाबेन आणि सोनूची एक्झिट झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोणी नव्या अभिनेत्री आल्या तर वेगळे वाटण्याचे काहीच कारण नाही. तर या मालिकेत फार आधीपासून जेठालाल, अंजली मेहता, तारक मेहता, बबिता, अय्यर, मिस्टर आणि मिसेस भिडे, गोली अशी काही पात्रे मालिकेच्या सुरुवातीपासून तीच आहेत.


फेब्रुवारी महिन्यात जन्मणाऱ्यांची वैशिष्ट्ये


(फोटो सौजन्य-Instagram)