तब्बल एक महिन्यांनी अंकिता लोखंडेने पोस्ट केला फोटो

तब्बल एक महिन्यांनी अंकिता लोखंडेने पोस्ट केला फोटो

सुशांत सिंह राजपूतला जाऊन आता  1  महिना पूर्ण झाला आहे. आजही तो गेला या बातमीवर त्यांच्या जवळच्या लोकांना विश्वास बसत नाही. सुशांत सिंहची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे त्याच्या जाण्यामुळे फारच दु:खी झाली होती. तिने सोशल मीडियावर किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरुन व्यक्त होणे सोडून दिले होते. पण एक महिन्यानंतर आता अंकिता लोखंडे पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसली आहे. तिने आज एक अशी पोस्ट शेअर केली आहे की, या फोटोमुळे ती अद्यापही सुशांतच्या जाण्याच्या दु:खातून बाहेर आली असे वाटत नाही. पण एक महिन्याने तिने हा फोटो शेअर केल्यामुळे तिच्या फॅन्सना दिलासा मिळाला आहे.

अजून एका अभिनेत्रीचे निधन, 29 व्या वर्षीच कॅन्सरमुळे गमावले प्राण

अंकिताने शेअर केला हा फोटो

अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर देव्हाऱ्यातील दिव्याचा फोटो शेअर केला आहे. देव्हाऱ्यातील हा दिवा शेअर करत तिने त्याला कॅप्शन CHILD Of GOD 😇 असे लिहिले आहे. आता या फोटोवरुन अनेकांनी तिला शांतता आणि प्रेमाचे इमोजी पाठवले आहेत. सुशांतसोबत रिलेशनशीप तुटून कित्येक वर्ष होऊन देखील अंकिताच्या मनात सुशांतबद्दल नेहमीच आत्मियता होती. त्यांनी त्यांच्या नात्यातील दुरावा उघड लोकांसमोर कधीच उघड केला नाही. आता हा फोटो शेअर केल्यानंतर तिच्या मनातील सुशांतबद्दलच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने समजून आल्या आहेत. 

View this post on Instagram

CHILD Of GOD 😇

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

निधनाची बातमी ऐकून बसला धक्का

Instagram

सुशांत सिंह राजपूतसारखा इतका तरुण कलाकार अशी अचानक आत्महत्या करेल असे कोणालाच वाटले नव्हते. 14 जून रोजी सकाळी सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या निधनाची बातमी ज्यावेळी अंकिता लोखंडेला समजली त्यावेळी तिने फोनवर…. काय? इतकेच म्हटले आणि फोन ठेवून दिला. त्याच्या अंत्यविधीसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ती सुशांतच्या घरी देखील गेली होती. त्यावेळीही ती धक्क्यात असल्याचे अनेक व्हिडिओमधून दिसून आले आहे. 

इशा गुप्ताचे हॉट फोटोशूट, तूप खाऊन मेंटेन केली फिगर

सुशांतसोबत ब्रेकअप आणि आता हे दु:ख

सुशांत आणि अंकिता यांची जोडी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून फारच प्रसिद्ध झाली होती. त्यांना प्रेक्षकांचीही पसंती मिळाली होती. या मालिकेतून त्याचे अफेअरही सुरु झाले होते. हे दोघे लग्न करतील अशी अपेक्षा सगळ्यांना होती. पण त्यांच्या लग्नाच्या बातमीआधीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली.  त्यांच्या ब्रेकअपमुळे फॅन्समध्ये तर निराशा पसरली. सुशांतला ब्रेकअपनंतर चित्रपटांमध्ये कामाची संधी मिळाली. तर अंकिता मात्र काही काळ या सगळ्यापासून दूर राहिली. सुशांतला चित्रपटांच्या एका मागोमाग ऑफर्स येत राहिल्या. पण अंकिताने सगळ्यापासून दूर राहायचे ठरवले.सुशांतच्या अफेअर्सच्या चर्चाही फार राहिल्या. पण त्याने कधीच या विषयी माहिती दिली नाही. त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले. पण तरीदेखील अंकिताने कधीच उघड उघड आपल्या नात्यातील व्यथा किंवा ब्रेकअपचे दु:ख मांडले नाही. आता सुशांतच्या निधनाच्या बातमीने तिला जास्त धक्का दिला आहे. 


पण एक नक्की की, अंकिता आता कुठे सुशांतच्या दु:खातून बाहेर येत आहे. 

कधी काळी या 5 चित्रपटांना दिला होता ऋतिक रोशनने नकार