प्रेग्नेंसीनंतर नताशा पंड्याचा हॉट अंदाज, फोटो वायरल

प्रेग्नेंसीनंतर नताशा पंड्याचा हॉट अंदाज, फोटो वायरल

भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू हार्दिक पंड्या नुकताच बाबा झाला आहे. त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिने तिच्या प्रेग्नंसीच्या बातमीपासून ते बेबी बंपपर्यंतचे अनेक फोटो आतापर्यंत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साधारण आई झाल्यानंतर मॉडेल किंवा अभिनेत्री कशा दिसतात याची उत्सुकता अनेकांना असते. नताशाच्या बाबतीतही हीच उत्सुकता अनेकांच्या मनात होती. पण नताशाने काही असे फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती प्रेग्नंसीनंतरही तशीच हॉट आणि मेंटेन असल्याचे दिसत आहे. तिचे हेच हॉट फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. नताशाचे हे हॉट फोटो तुम्ही पाहिलेत का?  चला पाहुयात नताशाचे हे हॉट फोटोज 

या कारणामुळे झाले होते अंकिता-सुशांत सिंहचे ब्रेकअप

नताशाने शेअर केले हॉट फोटो

नताशाने तिच्या प्रेग्नंसीमध्येही हॉट फोटोशूट केले होते. पण डिलेव्हरीनंतर तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे असे म्हणायला हवे. तिने पोस्ट केलेले काही फोटो तिच्या सौंदर्याबद्दल अधिक माहिती देत आहेत. तिने नुकताच तिच्या बाळासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. बाळ एक महिन्याचा झाला याची माहिती देताना तिने एक फोटो शेअर  केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हार्दिक आणि नताशा यांच्या या गोड मुलाचे नाव अगस्त्य असे आहे. त्यानंतर नताशाने आणखी एक फोटो शेअर केला असून ती एका शॉर्ट पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसतेय. बाथरुम मिरर सेल्फीमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा हॉट अंदाज पाहून हार्दिक पंड्यानेही तिच्या फोटोवर कमेंट केली आहे. इतकेच नाही तर तिला या फोटोला लाईक्सही खूप मिळाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या फोटोचीच चर्चा सगळीकडे होत आहे.

अखेर कंगनाची मुक्ताफळं थांबवायला रवीना सरसावली, दिले सडेतोड उत्तर

View this post on Instagram

Oh, hey there. 🙋🏻‍♀️🌸

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

अचानक प्रपोझ, लग्न आणि आई-बाबा

हार्दिक पंड्याचे आयुष्य हे नेहमीच वेगळे राहिले आहे. क्रिकेट वगळता त्याच्या लव्ह- अफेअर्सच्या चर्चाही खूप गाजल्या आहेत. एका क्रुझवर मॉडेल नताशा स्टेनकोविकला प्रपोझ केल्याचे फोटो वायरल झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. त्याने अचानकच तिला प्रपोझ केले होते. त्यानंतर लग्नाआधीच नताशा प्रेग्नंट असल्याच्या बातमीने जोर धरला होता. त्यानंतर नताशाने तिच्या प्रेग्नंसीची बातमी दिली. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी एकदम झटपट झाल्या आहेत.हार्दिक पंड्या हा करण जोहरच्या शोमधील कॉन्ट्राव्हर्शिअल स्टेटमेंटमुळे अधिकच पुढे आला होता.

नताशाचा वाढला फॅन बेस

क्रिकेटरच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना नेहमीच उत्सुकता असते. त्यांचे कोणासोबत रिलेशनशीप सुरु आहे याचा शोध अनेकजण घेत असतात. हार्दिक पंड्या या आधी अनेकांसोबत रिलेशनशीप असल्याच्या अफवा होत्या. काही अफवा या खऱ्यासुद्धा होत्या. पण या अफवांना बगल देऊन त्याने नताशाला प्रपोझ केले आणि तिच्यासोबत लग्नसुद्धा केले. नताशाला देखील त्यामुळे खूपच फायदा झाला.हार्दिकमुळे अनेकांचे लक्ष नताशाकडे आपसुकच वळले. त्यामुळे नताशाचाही फॅनबेस चांगलाच वाढला. 


आता राहिला प्रश्न नताशाच्या या हॉट लुकचा तर तिने प्रेग्नंसीचा आनंद घेऊन स्वत:ला छान मेन्टेंनही केले आहे हे तिच्या फोटोंवरुन अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

स्वराज्यजननी जिजामाता' रोमांचक वळणावर, डॉ. अमोल कोल्हेची खास भूमिका