सारानंतर आता ही नवोदित अभिनेत्री कार्तिकच्या प्रेमात

सारानंतर आता ही नवोदित अभिनेत्री कार्तिकच्या प्रेमात

कार्तिकची सध्या चांदीच चांदीच सुरु आहे. जो तो कार्तिकच्या प्रेमात पडतोय.. आता तुम्ही म्हणाल, आता आणखी कोण त्याच्या प्रेमात पडलंय.  म्हणजे सगळ्यांना सैफची लाडकी लेक सारा अली खान कार्तिक आर्यनच्या प्रेमात आहे हे माहीत होतं. कारण तिने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळीच तिचा क्रश कार्तिक आर्यन असल्याचे म्हटले होते. तर आता आणखी एक नवोदित अभिनेत्री कार्तिकच्या प्रेमात आहे ती आणखी कोणी नसून #soty2 ची नवी विद्यार्थी  अनन्या पांडे आहे. हे आम्ही नाही तिने स्वत:च याची कबुली दिली आहे.


अनन्या पांडेने शेअर केले स्वत:वरील फनी मीम्स


कार्तिक एकदम क्युट- अनन्या


pati-patni-aur-woh1


सध्या #soty2 च्या प्रमोशनमध्ये सगळी टीम व्यग्र आहे. 20 वर्षांची अनन्या पांडेने तिचे विचार जाहीर बोलून दाखवले आहे. ती म्हणाली, मी  20 वर्षांची आहे आणि स्वाभाविक आहे की, माझे कोणावर तरी क्रश असणार. मी कार्तिक आर्यनबद्दलच्या माझ्या भावना उघडपणे व्यक्त करणार आहे. मला  कार्तिक आर्यन खूप क्युट वाटतो.


आता कळलं का हे नेमंक प्रकरण काय आहे!  आता हे नक्की की, बी टाऊनमध्ये कार्तिकला घेऊन लवकरच सगळ्या पझेसिव्ह होणार आहेत. आता कोणती सेलिब्रिटी कार्तिकच्या प्रेमात पडणार आहे ते पाहायला हवे. शिवाय कार्तिक कोणाच्या प्रेमात पडणार हे देखील पाहायला हवे नाही का?


अब सारा का क्या होगा ?

आता हा झाला मस्करीचा भाग पण साराने देखील कार्तिक आर्यनबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. एकदा नाही तर अनेकदा… त्याला भेटल्यानंतर तिला काय वाटले हे देखील तिने सांगितले. पण साराला तिच्या या लकी चार्मसोबत काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. तिच्याच वडिलांच्या ‘लव आज कल ’ च्या सीक्वलमध्ये ती दिसणार आहे. काहीच दिवसांपूर्वी त्यांचा लीपलाॅकचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. सध्या या चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. दिल्लीमध्ये या चित्रपटाचे शुटींग सुरु असून या चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो पापाराझींकडून समोर येत असतात.


तर अनन्याही करणार कार्तिकसोबत काम


pati-patni-aur-woh


साराच नाही तर अनन्यादेखील या बाबतीत लकी आहे असे म्हणायला हवे कारण कार्तिक सोबत अनन्याही चित्रपटात काम करणार आहे.  1978 साली आलेल्या संजीव कपूर यांच्या ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये आहे असे कळत आहे. एकूणच काय सारा आणि अनन्या या दोघांना कार्तिकसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.


विराटने केला अनुष्काचा बर्थडे रोमँटिक, पाहा व्हिडिओ


आता प्रतिक्षा चित्रपटाची

करण जोहरचा बहुचर्चित #soty2  चर्चेत आहे तो केवळ दोन नवोदित अभिनेत्रींमुळे. चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर लोकांना तो फार काही आवडला नाही. आभासी दुनियेतील कॉलेज आणि धर्मा स्टाईल मोठेपणा अनेकांना आवडला नाही. शिवाय ज्या अनन्या पांडेला लोकांनी इन्स्टा्ग्रामवर फॉलो केले तिचा अभिनयही फारसा लोकांना आवडला नाही. त्यामुळे आता चित्रपटात तिने कसे काम केले आहेय हे पाहण्यासाठी आपल्याया चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.


लव आज कल2 मध्ये सारा करणार कार्तिकसोबत रोमान्स


(सौजन्य- Instagram)