किंग खानचा बदललाय मूड

किंग खानचा बदललाय मूड

बॉलीवूडचा किंग खान सध्या वेगळ्या मूडमध्ये दिसत आहे. मोठ्या पडद्यापासून तो बरेच काळ लांब आहे. मागच्या वर्षी शाहरूख खानचा जीरो रिलीज झाला पण हा सिनेमा काही प्रेक्षकांना आवडला नाही. शाहरूख खानच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही 'जीरो'च मिळाला.

किंग खानने मोठी रिस्क घेत या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. चित्रपटातील शाहरूखच्या अभिनयाचं कौतुक झालं पण तांत्रिकरित्या या सिनेमाची भट्टी जमून आली नाही आणि हा सिनेमा पडला. या धक्क्यातून अजूनही शाहरूख सावरला नाही, असं दिसतंय.


शाहरूखची सावध खेळी
 

 

 


View this post on Instagram


 

 

Two many beautiful women..Too little time. Will be back NYC to savour their company & love again...soon.


A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on
काही दिवसांपूर्वी शाहरूखने घोषण केली होती की, त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा तो जून महीन्यात करेल पण आता मात्र किंग खानचा मूड बदलला आहे. नुकत्याच एका इंटरव्हयूमध्ये शाहरूखने सांगितलं की, मी म्हटलं होतं की, माझ्या आगामी प्रोजेक्टची घोषणा मी लवकरच करेन पण ती घोषणा मी जून महिन्यात करू शकणार नाही. मी अनेक स्क्रीप्ट्स ऐकल्या आहेत. मला त्यातील 2-3 स्क्रीप्ट्स आवडल्याही आहेत. पण कोणत्या चित्रपटात काम करायचं याबाबत मी अजून काही ठरवलेलं नाही.


शाहरूखचा मोर्चा साऊथकडे
 

 

 


View this post on Instagram


 

 

Branding


A post shared by Vijay Official Fan Page (@vijay_official) on
बॉलीवूडमध्ये अपयश मिळालं म्हणून काय झालं शाहरूखने साऊथकडे मोर्चा वळवल्याचं दिसतंय. अक्षयकुमारनंतर शाहरूखही लवकरच साऊथचा सुपरस्टार विजयच्या आगामी 'थलपती 63' मध्ये दिसणार असल्याचं सूत्राकडून कळतंय. या चित्रपटात शाहरूख व्हिलनच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटात शाहरूखचा विजयसोबत अॅक्शन सीक्वेन्सही असेल.  


शाहरूख आणि संजय लीला भन्साली पुन्हा एकत्र


58961832 632097530551363 8248274686440447900 n


सूत्रानुसार, देवदास नंतर तब्बल 20 वर्षांनी शाहरूख खान आणि संजय लीला भन्साली पुन्हा एकत्र काम करणार आहेत. त्यांनी आगामी सिनेमाचं नावही रजिस्टर केल्याचं कळतंय. अशीही बातमी आहे की, किंग खान राकेश शर्माच्या बायोपिकवर काम सुरू करण्याची शक्यता आहे. या चित्रपटासाठी आमिर खानने निर्मात्यांना शाहरूखचं नावं सुचवलं होतं. पण नंतर बातमी आली की, किंग खानने हा सिनेमा सोडला. पण अजून पर्यंत निर्मात्यांनी मात्र याबाबत काही घोषण केली नाही. सूत्रानुसार, किंग खान आपल्या सुपरहिट चित्रपट डॉन फेंचाईजीचा तिसरा चित्रपटावरही काम सुरू करू शकतो. पण याबाबत काही घोषणा झाल्याचं अजून कळलेलं नाही. एकूणच काय तर या सगळ्या चर्चा आहेत. त्यामुळे सध्या शाहरूखचे फॅन्स त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत.


हेही वाचा -