अजय देवगण पहिल्यांदाच करणार यशराज बॅनरमध्ये काम, अहान पांडेचे पदार्पण

अजय देवगण पहिल्यांदाच करणार यशराज बॅनरमध्ये काम, अहान पांडेचे पदार्पण

अजय देवगण बॉलीवूडमध्ये गेल्या वीस वर्षांपेक्षा  अधिक कालावधीपासून काम करत असून आतापर्यंत 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अजय देवगणने काम केले आहे. मात्र बॉलीवूडमध्ये प्रतिष्ठित समजण्यात येणाऱ्या यशराजमध्ये आतापर्यंत कधीही अजयने काम केलेले नाही. यशराज फिल्म्स यंदा 50 वे वर्ष पूर्ण करत आहे. त्यामुळे प्रोजेक्ट 50 अन्वये काही आगामी चित्रपटांची घोषणा करण्यात येत आहे. या चित्रपटांपैकी एका चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत असून सुपरहिरो ड्रामा असा हा चित्रपट असणार आहे. तसंच या चित्रपटातून अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेचे बॉलीवूडमध्ये पदार्पण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सकडून करण्यात येणार असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. हा चित्रपट शिव रवैल दिग्दर्शित करणार असून 50 व्या वर्धापनादिनानिमित्त हा चित्रपट तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Class of 83: बॉबी देओल नाही तर यामुळे चित्रपट ठरतो खास

अजय देवगणसह अहान पांडेला मिळाली महत्त्वाची भूमिका

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अजय आणि अहान या दोघांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. तसंच भारंभार व्हीएफएक्स आणि व्हिज्युअली इफेक्ट्सने हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर अजय देवगण यामध्ये नकारात्मक भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एका सुपरहिरो सिरीजचा भाग असून प्रत्येक सिरीजमध्ये एक नवा खलनायक असेल. सुपरहिरोच्या या पहिल्या सिरीजमध्ये अजय देवगण खलनायकाची निभावणार असून नायकाची भूमिका अहान पांडे साकारणार आहे.’ यापूर्वीही अजय देवगणने तेज आणि प्रकाश झा च्या राजनीति चित्रपटात नकारात्मक भूमिका साकरली होती. अजय देवगण हा एक कसलेला कलाकार असून ही भूमिका अप्रतिम साकारेल असा विश्वास व्यक्त  करण्यात आला आहे. 

बॉलीवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करण्याची स्टारकिडची 'प्रक्रिया' सुरू

अतिशय ग्रँड चित्रपट बनणार

यशराज फिल्म्सचा हा सुपरहिरो ड्रामा चित्रपट एक अतिशय मोठ्या बजेटचा ठरणार आहे. याबद्दल सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे, एखाद्या नवोदित अभिनेत्याला इतक्या ग्रँड चित्रपटाद्वारे पदार्पण करण्याची संधी मिळणं हे अतिशय दुर्लभ आहे. तसंच आदित्य चोप्रा यांना अहान पांडेवर पूर्ण विश्वास असून अहान ही भूमिका व्यवस्थित साकारेल असंही त्यांना वाटत आहे. तसंच या चित्रपटाचा दिग्दर्शक शिव रवैलदेखील नवोदित असून आदित्य चोप्राने त्याच्यावरही तितकाच विश्वास दाखवला आहे. हा आव्हानात्मक प्रोजेक्ट सर्वच एकत्रितपणे चांगला झेपवतील आणि यशस्वी ठरवतील असाही विश्वास यशराज फिल्म्सने दर्शवला आहे. अजय देवगणची स्टार पॉवर या चित्रपटाला अधिक लोकप्रिय ठरवेल असाही विश्वास व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल उत्सुकता खूपच वाढली असून या चित्रपटात अहान पांडेसह कोणत्या अभिनेत्रीला कास्ट करण्यता येणार आहे  याकडेही लक्ष लागून राहिले आहे. अहान पांडे हा चंकी पांडेचा पुतण्या असून बॉलीवूडमध्ये येण्याआधीपासूनच त्याचा चांगला फॅन फॉलोईंग आहे. बरेचदा सुहाना खान आणि आर्यन खानसह अहान पांडेचे फोटो व्हायरल झाले आहेत. तसंच त्याचे अॅक्टिंगचेही काही व्हिडिओ व्हायरल झाले असून आता चित्रपटात अहान नक्की काय आपले पाऊल कसे रूतवतोय ते पाहावं लागेल.

एस. एस. राजमौलीच्या 'RRR' मध्ये आता आलियाऐवजी प्रियांकांची वर्णी

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा