सा रे ग म प विजेता ऐश्वर्य निगम या गायिकेसोबत अडकला लग्नबंधनात

सा रे ग म प विजेता ऐश्वर्य निगम या गायिकेसोबत अडकला लग्नबंधनात

सेलिब्रिटींच्या लग्नाचा सीझन आता सुरु झाला आहे. कारण सेलिब्रिटींच्या लग्नाच्या तारखा आता समोर येऊ लागला आहे. गेल्या महिन्यात ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अभिनेत्री मोहिना कुमारीचा रॉयल वेडींग सोहळा पार पडला. आता आणखी एका सेलिब्रिटीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. सा रे ग म प विजेता ऐश्वर्य निगम नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. गायिका आणि अभिनेत्री दिपाली सहायसोबत त्याने लग्न केलं असून त्याचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या राय देणार गोड बातमी...फोटो व्हायरल

अत्यंत साधेपणाने लग्न

Instagram

दिपाली आणि ऐश्वर्य यांना तामिळनाडू येथे जाऊन लग्न केले. त्यांनी अत्यंत साधेपणाने लग्न केलं आहे. त्यांचे फोटो मयांग चांगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. मयांगने शेअर केलेल्या या फोटोमध्ये दिपालीच्या कपाळी केशरी रंगाचे सिंधूर दिसत आहे. तिने हिरव्या आणि गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला असून तिने नाकात अगदी टीपिकल मोठी रिंग घातली आहे. तर ऐश्वर्यने व्हाईट कुडता आणि नेहरु जॅकेट परिधान केले आहे.

इंडियन आयडॉलमधून मिळाली ओळख

Instagram

दिपाली सहाय ही इंडियन आयडॉल 3 ची स्पर्धक होती. तर मयांग चांग हा सीझन 1 चा स्पर्धक होता.  दोघांमध्ये चांगली मैत्री असून मयांक चांगने तिचे फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत त्याने एक छान कॅप्शनसुद्धा लिहिली आहे. या कॅप्शनमध्ये त्याने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.  शिवाय त्याने 'तुम्ही या आधी दिपालीला सरस्वती अवतारात पाहिले आहे... आता ती दुर्गा.. काली या सगळ्या अवतारात संसारात दिसणार असल्याचा टोमणा दिला आहे. 

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी दरम्यान हाणामारी, व्हायरल झाला व्हिडिओ

दिपाली सहायचा करिअरग्राफ

Instagram

दिपाली सहायने अनेक चित्रपटांसाठी  प्ले बॅक सिंगिंग केलेले आहे. तिची अनेक गाणी प्रसिद्ध आहे. ती स्वत:चे कव्हर अल्बम तयार करते. पण ती सध्या फार प्रसिद्ध नाही. तर सा रे ग म प 2006 चा विजेता ठरलेल्या ऐश्वर्यने मात्र या क्षेत्रात बरेच काम केले आहे. सा रे ग म प चे टायटल जिंकल्यानंतर त्याला अनेक चित्रपटांमध्ये प्ले बॅक सिंगिंग करण्याच्या ऑफर्स आल्या. मुन्नी बदनाम हुई, कितनी मोहब्बत है या सिरीअलचे टायटल ट्रॅक गायलेले आहे.  सा रे ग म प व्यतिरिक्त त्याने ‘जो जीता वही सिंकदर’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे. 

 

 

दिपाली इन्स्टावर अॅक्टीव्ह

इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटी आहेत. त्यांचे फॉलोअर्सही भरपूर असतात. पण दिपाली सहाय आणि ऐश्वर्य यांचे इन्स्टाग्रामवर म्हणावे तितके फॉलोअर्स नाहीत. दिपाली तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन नेहमीच गाण्याचे वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असते. ऐश्वर्य आणि दिपाली यांनीही कितीतरी गाणी एकत्र गायली आहेत. 

 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.