Good News: बच्चन कुटुंबात पुन्हा नवी खुषखबर, ऐश्वर्या पुन्हा प्रेगनंन्ट

Good News: बच्चन कुटुंबात पुन्हा नवी खुषखबर, ऐश्वर्या पुन्हा प्रेगनंन्ट

अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे चित्रपट नसले तरीही हे दोन्ही असे कलाकार आहेत जे नेहमीच चर्चेत असतात. अभिषेक आणि ऐश्वर्या सध्या गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. त्यांचा एक फोटो व्हायरल झाला असून सर्वात जास्त चर्चा आहे ती ऐश्वर्या पुन्हा प्रेगनंन्ट असल्याची. यावरून सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. ‘द गोवन एव्हरीडे’ या वृत्तपत्रात एक फोटो छापून आल्यानंतर या चर्चांना जास्त प्रमाणात फोडणी मिळाली आहे. इतकंच नाही तर अनेक चाहते ती प्रेगनंन्ट आहे की नाही यावर चर्चा करत आहेत. काही चाहत्यांच्या म्हणण्यानुसार कान्स फिल्म फेस्टिव्हल जवळ येत आहे तर असं काहीही नसावं. अशा तऱ्हेच्या अगदी प्रार्थनाही चाहत्यांनी केल्या आहेत.
गोव्यामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या


अभिषेक आणि ऐश्वर्या हे सध्या गोव्यात आहेत. आराध्याचे आई - वडील असलेल्या या दोघांकडेही पुन्हा गुड न्यूज असल्याचं म्हटलं जात आहे. पण यावरून अनेक चाहत्यांमध्ये चर्चा चालू झाली आहे. ऐश्वर्या खरंच गरोदर आहे की नाही यावरून सोशल मीडियवर सध्या बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नाही तर या दोघांना अजून एक बाळ व्हावं अशा इच्छाही सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहेत. वास्तविक अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला बारा वर्ष झाली असून त्यांना आराध्या नावाची एक मुलगी आहे. आराध्या आता साधारण आठ वर्षांची झाली असून पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात झाली आहे. आराध्या नेहमीच आपल्या आई - वडिलांबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसून येते. अगदी बच्चन घराण्याला शोभेल अशीच तिची वागणूकही आहे. दरम्यान या फोटोमध्ये ऐश्वर्याचं पोट हे एखाद्या बेबी बंपप्रमाणे दिसून येत असल्यामुळे या सर्व चर्चेला सुरुवात झाली.अभिषेक आणि ऐश्वर्याची केमिस्ट्री


अभिषेक आणि ऐश्वर्या हे 2005 मध्ये ‘बंटी और बबली’ च्या सेटवर भेटले आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. 2007 मध्ये गुरु चित्रपटादरम्यान मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्यांनी त्याच वर्षी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आता बारा वर्ष होऊन गेली असून अजूनही दोघांची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांना पाहायला मिळते. अभिषेक आणि ऐश्वर्याला आजही कुठेही एकत्र पाहिल्यानंतर हे दोघं एकमेकांसाठी बनले आहेत असंच चाहत्यांच्या तोंडून वाक्य येतं. आजही बऱ्याच ठिकाणी दोघेही फिरायला जातात आणि त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहावी असंही त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे.


ashabhi


गरोदर असण्याच्या अफवेला अनेक अभिनेत्री सामोऱ्या


सध्या काहीही झालं की, लगेच सोशल मीडियावर व्हायरल होत असतं. त्यामुळे सेलिब्रिटीजचं आयुष्यदेखील अक्षरशः सोशल झालं आहे. जरा काही झालं की, फोटोज व्हायरल होतात. या अफवेची केवळ ऐश्वर्याच शिकार झालेली नाही. तर काही दिवसांपूर्वीच टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या बाबतीतही हे घडलं आहे. दिव्यांकाच्या बाबतीत तर असं बरेच वेळा घडलं आहे. इतकंच नाही तर नुकताच हा प्रसंग अभिनेत्री अनुष्का चोप्रावरही ओढवला होता. गरोदर असणं ही प्रत्येकाच्या आयुष्यातली खासगी बाब आहे. मात्र सेलिब्रिटी असल्यामुळे याची लगेच चर्चा होताना दिसते. इतकंच नाही तर एका कार्यक्रमांतर्गत मागच्या काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा जोनसदेखील गरोदर असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. याबाबत तिच्या आईला खुलासा द्यावा लागला होता. अशा अनेक सेलिब्रिटीजच्या बाबतीत सध्या हे घडत आहे. आता ऐश्वर्याही या चर्चेचा एक भाग झाली आहे.


फोटो सौजन्य -  Instagram, Twitter


हेदेखील वाचा


अभिषेकमुळे करणने रंगपंचमी खेळणे केले बंद, रिअॅलिटी शो दरम्यान कबुली


Good News: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी प्रेगनंन्ट, फोटो झाले व्हायरल


जेव्हा सलमान खानमुळे ऐश्वर्याला गमवावे लागले होते 5 चित्रपट