ऐश्वर्या राय बच्चन बनणार अँजेलिना जोलीचा आवाज

ऐश्वर्या राय बच्चन बनणार अँजेलिना जोलीचा आवाज

ऐश्वर्या राय बच्चन जगत् सुंदरी तर आहेच. अनेक चाहत्यांच्या आवडती असणारी ऐश्वर्या ही बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्येही तितकीच प्रिय आहे. प्रियांकाप्रमाणेच ऐश्वर्याचादेखील हॉलीवूडमध्ये एक चाहतावर्ग आहे. आता ऐश्वर्या रायने अजून एक हॉलीवूड प्रोजेक्ट साईन केला आहे. हा इंटरनॅशनल प्रोजेक्ट डिस्नी क्लबचा आहे. ऐश्वर्या राय लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘मेलफिशंटः मिस्ट्रेस ऑफ एव्हिल’ च्या हिंदी वर्जनमध्ये आपला आवाज देणार आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय डबिंग करणार असणारी कलाकार दुसरी तिसरी कोणी नसून अँजेलिना जोली आहे. इंग्रजी व्हर्जनमध्ये अर्थातच अँजेलिनाचं डबिंग असेल. 

Bigg Boss 13: घरात होणार 3 हँडसमची एंट्री

मेलफिशंट या चित्रपटाचा सिक्वेल

View this post on Instagram

Who’s ready to see Angelina in Maleficent 2?! 😍

A post shared by Angelina Jolie (@angelinajolie_offiicial) on

‘मेलफिशंटः मिस्ट्रेस ऑफ एव्हिल’ हा चित्रपट 18 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये वाईटाविरुद्ध चांगलं अशी लढाई दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या मेलफिशंट या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये असणारी परी ही स्लिपिंग ब्युटी म्हणून दिसते. यानुसार, एका राजकुमारीला (Aurora) एक वाईट परी झोपेत राहण्याचा शाप देते आणि तिच्या 16 व्या वाढदिवसाच्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी तिचा मृत्यू होईल असाही ती शाप देते. यामध्ये दाखवण्यात आल्यानुसार Maleficent ही आधी अतिशय दयाळू परी होती. पण तिला प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे ती अशी वाईट झाली आहे. हा प्रेमी इतर कोणी नसून त्या राजकुमारीचा पिता आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होत आहे. Aurora आणि Maleficent च्या नात्याची कथा या दुसऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय त्यावर कळस म्हणजे यासाठी ऐश्वर्या राय बच्चनचा आवाजही ऐकायला मिळणार आहे. ऐश्वर्याचे लाखो करोडो चाहते आहेत. लग्न झाल्यापासून ऐश्वर्या खूपच कमी चित्रपटात काम करताना दिसते. आता पुन्हा एखदा ऐश्वर्याचा आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळणार म्हणजे त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे.  यासंदर्भात डिस्नी इंडियाच्या स्टुडिओ एंटरटेनमेंट हेड विक्रम दुग्गलच्या म्हणण्यानुसार अँजेलिना जोली आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये खूपच समानता आहेत. या दोघीही अतिशय सुंदर आणि एलिगंट आहेत. त्यामुळे अँजेलिनासाठी ऐश्वर्या राय बच्चनाचा आवाज आम्हाला योग्य वाटला असं त्यांनी सांगितलं आहे. 

'The Kapil Sharma show' मध्ये पुन्हा येणार का नवज्योत सिंह सिद्धू

ऐश्वर्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

View this post on Instagram

✨🥰💖My ETERNAL ANGEL😍❤️😘😇🌈✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

ऐश्वर्या जरी जास्त चित्रपटातून काम करत नसली तरीही ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. तिच्या अकाऊंटवरून ती बरेच व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. अनेक ठिकाणी कार्यक्रमांना ती हजेरी लावत असते. ऐश्वर्या करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्कील’ चित्रपटातून प्रेक्षकांना रणबीर कपूरबरोबर दिसली होती. या दोघांची केमिस्ट्री या चित्रपटात प्रेक्षकांना आवडली होती. ऐश्वर्या सध्या आपली मुलगी आराध्याच्या संगोपनामध्ये व्यस्त असून नेहमी तिच्याबरोबरील तिचे फोटो व्हायरल होत असतात. याशिवाय अनेक फेस्टिव्हल्सनादेखील ऐश्वर्या उपस्थित असते. दरवर्षी कान्स फेस्टिव्हलला ऐश्वर्या न चुकता हजेरी लावते. यामध्ये तिचा लुक कसा असणार याचीही चर्चा नेहमीच रंगत असते. आता ऐश्वर्या यानंतर कोणता प्रोजेक्ट करणार आणि कोणत्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार याचीही उत्सुकता चाहत्यांना सध्या लागून राहिली आहे. तसंच ऐश्वर्या कधी आता पुन्हा चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार यासाठी तिचे चाहते वाट बघत आहेत.

कल्की केकलाच्या pregnancyवर अनुराग कश्यपने दिली ही प्रतिक्रिया

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.