अजय-काजोलची 'निसा' होतेय या कारणामुळे सतत ट्रोल

अजय-काजोलची 'निसा' होतेय या कारणामुळे सतत ट्रोल

सेलिब्रिटींचे एक चुकीचे वागणे त्यांच्या ट्रोल होण्याचे कारण बनू शकते. याचा अनुभव सध्या अजय देवगणची मुलगी निसा देवगणला आला आहे. काल ती अजय देवगणसोबत एअरपोर्टवर दिसल्यानंतर  लोकांनी तिला पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या मागचे कारण आहे निसा देवगणचा एक फोटो... घरात आजोबांचे निधन झाले हे कळूनही मित्रांसोबत सलोनला जाऊन मजा करणारी निसा आणि आता दु:खात बुडालेली निसा अशा या दोन फोटोमुळे सध्या तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#ajaydevgan with #nysadevgan and #yugdevgan #airportdiaries #viralbhayani and


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
या कारणामुळे रश्मी देसाईने दिला बिग बॉस 13 ला नकार


नेमकं प्रकरण काय?


nyasa devgan fi %281%29


झालं असं की, वीरु देवगण म्हणजे अजय देवगणचे वडील यांचे 27  मे रोजी निधन झाले. अॅक्शन दिग्दर्शक म्हणून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये खूप काम केली आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर बॉलीवूडमधून हळहळ व्यक्त केली जात असताना एक असा फोटो समोर आला ज्यामुळे लोकांना धक्काच बसला. अजय देवगणची मुलगी निसा देवगण वीरु देवगण यांच्या निधनाच्याच दिवशी सलोनमधून बाहेर येताना दिसली. आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत खिदळतानाचे तिचे फोटो पापाराझींनी 27 मे रोजी व्हायरल केले. त्यामुळे आजोबा वारलेले असताना त्यांची नात अशी कशी वागू शकते अशा प्रकारच्या टीका तिच्यावर होऊ लागल्या पण आता ती काल एअरपोर्टवर दिसली. यात ती दु:खी वाटतेय. त्यामुळे ती निसा खरी ही निसा असा प्रश्न विचारत लोकांनी तिला ट्रोल केले आहे.


तो फोटो केला Delete


निसाचा  सलोनमधून बाहेर पडतानाचा तो फोटो आता सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आला आहे. पण तो फोटो वीरु देवगण वारले त्याच दिवसाचा आहे असे सांगता येत नाही. कारण अनेकदा काढलेले फोटो सोशल मीडियावर वेगवेगळ्या दिवशी अपलोड केले जातात. त्यामुळे आता हा फोटो कधीचा हे कदाचित निसालाच माहीत असेल. पण या फोटोंमुळे ती आता चांगलीच ट्रोल होत आहे.


वाचा- प्रसिद्धीसाठी निकशी लग्न केल्याच्या आरोपावर काय म्हणाली प्रियांका


निसा सोशल मीडियावर चर्चेत


nyasa fi


स्टार किड नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्यात निसा ही सुपरस्टार अजय देवगण आणि काजोल यांची मोठी मुलगी. शिक्षणासाठी परदेशात असल्यामुळे तिला या आधी जास्त कोणी पाहिले नव्हते. पण गेल्या काही वर्षापासून ती चर्चेत आहे. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या नावाने अनेक फॅन पेज देखील सोशल मीडियावर आहे. तिच्या हॉट अंदाजाने तिने सगळ्यांवरच मोहिनी घातली होती. त्यामुळे तिला पापाराझी सगळीकडे फॉलो करत असतात. पण या फोटोनंतर निसा अधिक जबाबदारीने वागताना दिसत आहे.


चर्चेनंतर अकाऊंट केलं Private


सोशल मीडियावर रंगलेल्या उलट- सुलट चर्चानंतर आता निसाने तिचे अकाऊंट सोशल मीडियावर Private केले आहे. त्यामुळे आता निसाच्या चाहत्यांची मात्र पुरती निराशा होणार आहे. बॉलीवूडपासून लांब असलेल्या निसाला तिच्या एका फोटोमुळे नको त्या कमेंटसना सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच कदाचित तिने तिचे अकाऊंट Private केले असावे असा अंदाज आहे.


बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा हा #hot सेलिब्रिटी तुम्हाला माहीत आहे का?


(फोटो सौजन्य- Instagram)