बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याचे वडील आणि लोकप्रिय अॅक्शन दिग्दर्शक वीरू देवगण यांचे निधन झाले आहे. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ANI रिपोर्टनुसार वीरू देवगन यांचे कार्डीएक अरेस्टमुळे निधन झाले आहे. आज संध्याकाळी सहा वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून संपूर्ण चित्रपटसृष्टी वीरू देवगन यांच्या निधनाने दुःखी झाली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी वीणा देवगण, मुलगा अजय देवगण आणि अनिल देवगण असा परिवार आहे. अजय देवगन आणि काजोल अभिनयक्षेत्रात असून अनिल देवगण दिग्दर्शनक्षेत्रात आहे. काही दिवसांपासून वीरू देवगण यांची तब्ब्येत ठिक नसून मुंबईतील सांताक्रुझमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वीच अजय देवगणने वडिलांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्याच्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाचे प्रमोशनल कार्यक्रम पुढे ढकलले होते. वीरू देवगण यांच्या निधनाचे कारण असूनही उघड करण्यात झालेलं नाही.
Veeru Devgan passed away this morning [27 May 2019]… Father of Ajay Devgn… Veeru ji was an accomplished action director… Also directed #HindustanKiKasam, starring son Ajay with Amitabh Bachchan… Funeral will be held today at 6 pm… Heartfelt condolences to Devgn family.
— taran adarsh (@taran_adarsh) May 27, 2019
अजय देवगण याच्या घरी सात्वंनासाठी बॉलीवूडचे कलाकार
अजय देवगणच्या घरी सनी आणि बॉबी
वीरू देवगण यांची सून अभिनेत्री काजोल
वीरू देवगण यांची कारकिर्द
वीरू देवगण यांचा जन्म अमृतसरमध्ये 1974 साली झाला. त्यांनी स्वबळावर हिंदी चित्रपट सृष्टीत एक लोकप्रिय अॅक्शन दिग्दर्शक म्हणून नाव कमावलं. ऐंशीच्या दशकातील अनेक चित्रपटांतील अॅक्शन आणि फाईटसीन वीरू देवगन यांनी दिग्दर्शित केले होते. दिलवाले, हिंमतवाला, शहेनशाह असे अनेक अॅक्शन चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 150 चित्रपटांसाठी काम केलं आहे. वीरू देवगण यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. त्यांनी 1999 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा अजय देवगणसाठी ‘हिंदूस्थान की कसम’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात अजय आणि महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री मनिषा कोईराला आणि सुश्मिता सेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यांनी अजय देवगनसोबत अनेक चित्रपट केलेले आहेत. देवगण आणि त्याचे कुटुंबिय वडीलांच्या जाण्याने फार दुःखी झाले आहेत.
अधिक वाचा
World Cancer Day च्या दिवशीच अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाने निधन
अभिनेता कादर खान यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन
सलमान खानला सुपरस्टार बनवणारे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम