अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन

अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याचे वडील आणि लोकप्रिय अॅक्शन  दिग्दर्शक वीरू देवगण यांचे निधन झाले आहे. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ANI रिपोर्टनुसार वीरू देवगन यांचे कार्डीएक अरेस्टमुळे निधन झाले आहे. आज संध्याकाळी सहा वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून संपूर्ण चित्रपटसृष्टी वीरू देवगन यांच्या निधनाने दुःखी झाली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी वीणा देवगण, मुलगा अजय देवगण आणि अनिल देवगण असा परिवार आहे. अजय देवगन आणि काजोल अभिनयक्षेत्रात असून अनिल देवगण दिग्दर्शनक्षेत्रात आहे. काही दिवसांपासून वीरू देवगण यांची तब्ब्येत ठिक नसून मुंबईतील सांताक्रुझमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वीच अजय देवगणने वडिलांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्याच्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाचे प्रमोशनल कार्यक्रम पुढे ढकलले होते. वीरू देवगण यांच्या निधनाचे कारण असूनही उघड करण्यात झालेलं नाही.अजय देवगण याच्या घरी सात्वंनासाठी बॉलीवूडचे कलाकार  
 

 

 


View this post on Instagram


 

 

#sanjaydutt and #sajidkhan the first ones to arrive after hearing the sad news of #VeeruDevgan demise today morning #rip 🙏


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
अजय देवगणच्या घरी सनी आणि बॉबी
 

 

 


View this post on Instagram


 

 

#sunnydeol #bobbydeol arrives to pay last respect to #veerudevgan who passed away today morning. #rip @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
वीरू देवगण यांची सून अभिनेत्री काजोल 
 

 

 


View this post on Instagram


 

 

#kajol seen at her residence managing the preparation of last rites of her father in law #veerudevgan whompassed away today morning


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
वीरू देवगण यांची कारकिर्द


वीरू देवगण यांचा जन्म अमृतसरमध्ये 1974 साली झाला. त्यांनी स्वबळावर  हिंदी चित्रपट सृष्टीत एक लोकप्रिय अॅक्शन दिग्दर्शक म्हणून नाव कमावलं. ऐंशीच्या दशकातील अनेक चित्रपटांतील अॅक्शन आणि फाईटसीन  वीरू देवगन यांनी दिग्दर्शित केले होते. दिलवाले, हिंमतवाला, शहेनशाह असे अनेक अॅक्शन चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 150 चित्रपटांसाठी काम केलं आहे.  वीरू देवगण यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. त्यांनी 1999 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा अजय देवगणसाठी 'हिंदूस्थान की कसम' या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात अजय आणि महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री मनिषा कोईराला आणि सुश्मिता सेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यांनी अजय देवगनसोबत अनेक चित्रपट केलेले आहेत. देवगण आणि त्याचे कुटुंबिय वडीलांच्या जाण्याने फार दुःखी झाले आहेत.


अधिक वाचा


World Cancer Day च्या दिवशीच अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाने निधन


अभिनेता कादर खान यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन


सलमान खानला सुपरस्टार बनवणारे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम